सिनेमा पहा आणि नवाजुद्दीनसोबत फोटो काढा!

या आठवड्यात कोणताही सिनेमा पाहिल्यास नवाजुद्दीनसोबत फोटो काढण्याची संधी सिनेप्रेमींना मिळणार आहे. 'फोटोग्राफ' या आगामी सिनेमाच्या निमित्तानं ही विशेष आॅफर देण्यात आली आहे.

SHARE

सिनेप्रेमी आणि नवाजुद्दीन सिद्दीकीच्या चाहत्यांसाठी आपल्या आवडत्या कलाकारासोबत फोटो काढण्याची एक नामी संधी चालून आली आहे. या आठवड्यात प्रदर्शित झालेला कोणताही सिनेमा पहा आणि नवाजुद्दीनसोबत फोटो काढा! अशी आॅफर सध्या सिनेमागृहांमध्ये सुरू आहे.


पब्लिसिटीची अनोखी संकल्पना

या आठवड्यात कोणताही सिनेमा पाहिल्यास नवाजुद्दीनसोबत फोटो काढण्याची संधी सिनेप्रेमींना मिळणार आहे. 'फोटोग्राफ' या आगामी सिनेमाच्या निमित्तानं ही विशेष आॅफर देण्यात आली आहे. खरं तर ही 'फोटोग्राफ' या सिनेमाची पब्लिसिटी करण्याची अनोखी संकल्पना आहे. आज सर्वच कलाकार आपापल्या सिनेमांच्या प्रमोशनवर खूप मेहनत घेत आहेत. नवाजुद्दीनसारखा अभिनेताही यात मागे नाही. सध्या तो 'फोटोग्राफ'च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे.


१५ मार्चला प्रदर्शित

'फोटोग्राफ' १५ मार्चला प्रदर्शित होणार आहे. असं असलं तरी या सिनेमाच्या प्रमोशनला मागील महिन्याभरापासून सुरुवात करण्यात आली आहे. नवाजुद्दीनसोबत फोटो काढणं हा देखील त्याचाच एक भाग आहे. या आठवड्यात बरेच सिनेमे प्रदर्शित होत आहेत. हे सिनेमे पाहण्यासाठी सिनेमागृहांमध्ये जाणाऱ्या प्रेक्षकांना तिथे असलेल्या नवाजुद्दीनच्या कटआऊटसोबत फोटो काढण्याची संधी उपलब्ध करून देणं हा देखील एक प्रमोशन फंडाच आहे, पण तो ज्या अनोख्या पद्धतीनं मांडण्यात आला आहे ते कौतुकास्पद आहे.


फोटोग्राफरची भूमिका

या सिनेमात नवाजुद्दीननं एका फोटोग्राफरची भूमिका साकारली आहे. गेट वे आॅफ इंडिया येथे येणाऱ्या पर्यटकांचे फोटो काढणारा रफी म्हणजेच नवाजुद्दीन आणि दिल्लीहून आलेली मिलोनी म्हणजेच सान्या मल्होत्रा यांची ही कहाणी आहे. या सिनेमात सान्या एका गुजराती तरुणीच्या भूमिकेत आहे. फोटोग्राफरच्या भूमिकेत असलेल्या नवाजुद्दीननं म्हटलेल्या 'स्माइल प्लीज' या दोन शब्दांवर ती फिदा होते. या सिनेमाचं लेखन-दिग्दर्शन रितेश बत्रा यांनी केलं आहे.हेही वाचा -

डी. एस. हायस्कूलमध्ये रंगली अनोखी ‘बूट रंगवा’ कार्यशाळा

मुक्ता म्हणतेय, 'उगीचच काय भांडायचंय?'संबंधित विषय
ताज्या बातम्या