Advertisement

डी. एस. हायस्कूलमध्ये रंगली अनोखी ‘बूट रंगवा’ कार्यशाळा

विद्यार्थ्याला या कलेबाबत माहिती व्हावी व त्यांना ही कला शिकता यावी या दृष्टीने सायनमधील शिव शिक्षण संस्थेच्या डी.एस.हायस्कूलच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ‘बूट रंगवा’ अर्थात शू डिझाईन या अनोख्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं होते.

डी. एस. हायस्कूलमध्ये रंगली अनोखी ‘बूट रंगवा’ कार्यशाळा
SHARES

जगभरात मोठमोठ्या महाविद्यालयात चपला किंवा शूजचे डिझाइनिंग हा अभ्यासक्रम शिकवला जातो. या अभ्यासक्रम शिकवण्यासाठी भरपूर फी आकारण्यात येत असल्याने सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी ही फी परवडत नाही. परिणामी या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्याला या कलेबाबत माहिती व्हावी व त्यांना ही कला शिकता यावी या दृष्टीने सायनमधील शिव शिक्षण संस्थेच्या डी.एस.हायस्कूलच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी ‘बूट रंगवा’ अर्थात शू डिझाईन या अनोख्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं होते. यात त्यांना शूज डिझाइन कसं करावं, ही कला कशी शिकावी, यातून करिअर कसे घडवावे या दृष्टीकोनातून प्रशिक्षण देण्यात आले. 



बुट रंगवा

शालेय वयातच विद्यार्थ्यांच्या कला जाणीवा समृद्ध होऊन त्यांच्यात चित्रकला, हस्तकला, शिल्पकला अशा विविध कलांबद्दल प्रेम निर्माण व्हावं, यासाठी डी. एस. हायस्कूलमध्ये चित्र पतंग कलासमूहाच्या सहकार्याने कला साक्षरतेच्या विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. या उपक्रमांतर्गत बुधवारी शाळेतील पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘शू रंगवा’ कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.  


अशी सुचली संकल्पना

कित्येकदा विद्यार्थी जुने वापरात नसलेले शुज फेकून देतात. परंतु या शुजला रंगरंगोटी करून ते पुन्हा वापरू शकतो. शिवाय यातून विद्यार्थ्यांना टाकाऊतून टिकाऊचे महत्त्वही विद्यार्थ्यांना कळेल. यानुसार बुधवारी शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांचे वापरात नसलेले जून बूट घरातून आणावेत अशी सुचना देण्यात आली. त्यानंतर अॅक्रेलिक रंगाचा वापर करत विद्यार्थ्यांनी त्यांचे बूट रंगवले.  या संकल्पनेपूर्वी चित्रपतंगच्या संचालिका प्राची आगवणे आणि मार्गदर्शिका निकिता शेलार यांनी सुरुवातीला विद्यार्थ्यांसमोर जगभरातील विविध प्रकारच्या बुटांचे आणि चपलांचे डिझाइन्सचे सादरीकरण केले होते. विशेष म्हणजे अनेक विद्यार्थ्यानी हुबेहुब बुट रंगवली होती. 


पादत्राण निर्मितीच्या व्यवसायात सर्वात महत्वाचं असतं ते डिझाइन. कपडे असोत की चपला, आपण वापरतो त्या प्रत्येक वस्तूत किंवा उत्पादनात डिझाइनच्या रुपाने कला ही दडलेलीच असते. ‘बूट रंगवा- शू डिझाइन’सारख्या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना डिझायनिंगचं महत्व समजावं आणि त्यांच्यात डिझायनिंगबाबत गोडी निर्माण व्हावी, हाच हेतू होता आणि बुधवारी झालेल्या या कार्यशाळेतून हा हेतू साध्य झाला आहे.

-  राजेंद्र प्रधान, अध्यक्ष, डी. एस. हायस्कूल



हेही वाचा -

... म्हणून साजरा केला जातो मराठी भाषा दिन

शिक्षकांचे आंदोलन मागे, निकाल वेळेतच लागणार



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा