मुक्ता म्हणतेय, 'उगीचच काय भांडायचंय?'

वेडींगचा शिनेमा' मधील 'उगीचच काय भांडायचंय? गोल गोल, पुन्हा पुन्हा, तेच तेच, काय बोलायचंय?...' हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. या गाण्याच्या माध्यमातून मुक्तानं या सिनेमात साकारलेल्या व्यक्तिरेखेच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. '

SHARE

मागील काही दिवसांपासून आगामी चित्रपटांच्या कामात व्यग्र असलेली अभिनेत्री मुक्ता बर्वे 'उगीचच काय भांडायचंय?' असं म्हणत आजच्या काळात तुटलेला संवाद जोडण्याचा मंत्र देत आहे. 'वेडींगचा शिनेमा' या आगामी सिनेमात गाण्याच्या माध्यमातून मुक्ताने हा एकमेकांना समजून घेण्याचा मंत्र दिला आहे.


गाणं प्रदर्शित

'वेडींगचा शिनेमा' मधील 'उगीचच काय भांडायचंय? गोल गोल, पुन्हा पुन्हा, तेच तेच, काय बोलायचंय?...' हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. या गाण्याच्या माध्यमातून मुक्तानं या सिनेमात साकारलेल्या व्यक्तिरेखेच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. 'वेडींगचा शिनेमा'मध्ये मुक्ता बर्वे, भाऊ कदम, शिवाजी साटम, अलका कुबल, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, प्रवीण तरडे, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हणमगर, योगिनी पोफळे या आघाडीच्या कलाकारांबरोबर शिवराज वायचळ आणि ऋचा इनामदार ही नवोदित जोडी आहे.


सलील कुलकर्णी दिग्दर्शनाकडे

प्रसिद्ध संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी दिग्दर्शनाकडे वळले आहेत. 'वेडींगचा शिनेमा' हा सलील यांच्याच दिग्दर्शनाखाली बनलेला आहे. या चित्रपटातील रिलीज झालेलं हे दुसरं गाणं आहे. मुक्तासह सिनेमातील इतर कलाकारांनी साकारलेल्या कॅरेक्टर्सच्या माध्यमातून त्यांच्या मनातील भाव व्यक्त करणारं हे गाणं सलील यांनीच लिहिलं असून, गायलंही आहे. आपल्यावर भरपूर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर आपण नेहमीच आणि उगीचच भांडत असतो, त्या भांडण्याला काही कारण पण नसतं, पण उगीचच आपण सगळ्यांसोबत भांडत असतो. हेच या गाण्याच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे.


१२ एप्रिलला प्रदर्शित

पारंपारिक रीतीरिवाज ते आधुनिक फॅड किंवा पद्धती यांचा मिलाप हल्ली भारतीय विवाह सोहळ्यांमध्ये पाहायला मिळतो. तो संपूर्ण कुटुंबासाठी उत्सवी क्षणांचा मेळावा असतो. 'वेडींगचा शिनेमा'मध्ये हे सगळे पैलू मनोरंजनाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. हा चित्रपट १२ एप्रिल २०१९ रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे. दिग्दर्शनासोबतच कथा, पटकथा, संवाद, संगीत या बाजूही सांभाळत सलील यांनी या सिनेमात चौफेर फटकेबाजी केली आहे.

हेही वाचा -

बेस्टच्या ताफ्यात येणार २० मिडी इलेक्ट्रिक बसगाड्या

‘रोटी डे’साठी सरसावले मराठी कलाकार-तंत्रज्ञसंबंधित विषय
ताज्या बातम्या