Advertisement

बेस्टच्या ताफ्यात येणार २० मिडी इलेक्ट्रिक बसगाड्या

आर्थिक तोटा सहन करणाऱ्या बेस्ट उपक्रमाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी महापालिकेनं भाड्याने बसगाड्या घेण्याची शिफारस केली होती. तसंच, या शिफारशीनुसार बेस्ट प्रशासनाने प्रस्ताव देखील तयार केला होता.

बेस्टच्या ताफ्यात येणार २० मिडी इलेक्ट्रिक बसगाड्या
SHARES

मुंबईची दुसरी लाईफलाईन समजली जाणाऱ्या बेस्टच्या ताफ्यात लवकरचं २० मिडी इलेक्ट्रिक बसगाड्या दाखल होणार आहेत. याबाबत बुधवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीमध्ये खासगी बसगाड्या भाड्याने घेण्याचा प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार आता ‘फेम इंडिया’अंतर्गत बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात वातानुकूलित आणि विनावातानुकूलित अशा प्रत्येकी २० मिडी इलेक्ट्रिक बसगाड्या भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत.


महापालिकेची शिफारस

आर्थिक तोटा सहन करणाऱ्या बेस्ट उपक्रमाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी महापालिकेनं भाड्याने बसगाड्या घेण्याची शिफारस केली होती. तसंच, या शिफारशीनुसार बेस्ट प्रशासनाने प्रस्ताव देखील तयार केला होता. मात्र, त्यावेळी बेस्टमधील संघटनेनं या प्रस्तावाला विरोध करून मुंबई उच्च न्यायालयाची वाट धरली होती. त्यामुळे या बसगाड्यांचा प्रस्ताव रखडला होता. 


प्रस्तावाला मंजुरी

बसगाड्या भाडेतत्वावर घेण्यासाठी ‘फेम इंडिया’मार्फत मिळणाऱ्या ७० टक्के आर्थिक मदतीचा ३१ मार्चपर्यंतच वापरण्यात करण्यात येणार आहे. त्यानंतर हा निधी वाया जाणार असल्यानं या प्रस्तावाला बेस्ट समितीनं मंजुरी द्यावी, अशी मागणी महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी बेस्ट समिती सदस्यांना केली. परंतू, या प्रकरणाबाबत न्यायालातून निर्णय येणं बाकी आहे.  त्यामुळं या प्रस्तावाला मंजूरी मिळाल्यास न्यायालयाचा अपमान होईल, असं विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी सांगितलं. त्यावेळी यावर केंद्रातून मिळणारा निधी वापरण्यासाठी केवळ एक महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. या कालावधीनंतर हा निधी वापरात येणार नाही आहे. त्यामुळं बेस्ट उपक्रमाची बाजू मुख्य न्यायाधीशांसमोर मांडण्यात येईल. तसंच, न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी ग्वाही महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी दिली. त्यानंतर बेस्ट समितीनं या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळं आता लवकरचं मुंबईकरांना बेस्टच्या भाडेतत्वावरील मिडी इलेक्ट्रिक बसगाड्यांमधून प्रवास करता येणार आहे.



हेही वाचा -

महाराष्ट्राचा अंतरिम अर्थसंकल्प सादर, जाणून घ्या महत्त्वाच्या तरतुदी

डी. एस. हायस्कूलमध्ये रंगली अनोखी ‘बूट रंगवा’ कार्यशाळा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा