Advertisement

सरकारी बँकांची तब्बल ३२ हजार कोटींची फसवणूक

माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांनी रिझर्व्ह बँकेकडे माहिती मागितली होती. आरबीआयने त्यांना दिलेल्या माहितीतून बँकांमधील ही फसवणुकीची प्रकरणे समोर आली आहेत.

सरकारी बँकांची तब्बल ३२ हजार कोटींची फसवणूक
SHARES

देशातील सरकारी बँकांची लूट अद्यापही सुरू असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत १८ सरकारी बँकांमधील फसवणुकीची २४८० प्रकरणं समोर आली आहेत. या फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये बँकांना तब्बल ३१ हजार ८९८.६३ कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. माहिती अधिकाराखाली मागवलेल्या माहितीतून ही फसवणूक समोर आली आहे. 

माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांनी रिझर्व्ह बँकेकडे माहिती मागितली होती. आरबीआयने त्यांना दिलेल्या माहितीतून बँकांमधील ही फसवणुकीची प्रकरणे समोर आली आहेत. २०१९-२० या आर्थिक वर्षातील जून -आॅगस्ट या तिमाहीत सर्वाधिक फसवणूक एसबीआयची झाली आहे. एसबीआयला १,१९७ फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये १२,०१२.७७ कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे.  त्यापाठोपाठ अलाहाबाद बँकेला प्रकरणांमध्ये २,८५५.६६ कोटींचा गंडा घातला आहे. 


बँकफसवणूक प्रकरणंफसवणुकीची रक्कम (कोटी रु. मध्ये)
एसबीआय  ११९७    
१२,०१२.७७
अलाहाबाद बँक   
   ३८१   
 २८५५.४६
पीएनबी   ९९ २५२६.५५ 
बँक ऑफ बडोदा       ७५  २२९७.०५
ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स     
   ४५  २१३३.०८
कॅनरा बँक          
    ६९२०३५.८१
सेंट्रल बँक ऑफ इंडिया          
   १९४ १९८२.२७
युनाइटेड बँक ऑफ इंडिया    
 ३१११९६.१९
काॅर्पोरेशन बँक   
१६९६०.८०
इंडियन ओवरसीज बँक४६९३४.६७
सिंडिकेट बँक५४७९५.७५
युनियन बँक ऑफ इंडिया५१७५३.३७
बँक ऑफ इंडिया४२५१७
युको बैंक३४४७०.७४



   हेही वाचा -

एसबीआयचे कर्ज आणखी स्वस्त, सलग पाचव्यांदा व्याजदरात कपात







संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा