Advertisement

एसबीआयचे कर्ज आणखी स्वस्त, सलग पाचव्यांदा व्याजदरात कपात

एसबीआयने २०१९-२० या चालू आर्थिक वर्षात सलग पाच वेळा व्याजदर घटवले आहेत. आता बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदरही घटवले आहेत.

एसबीआयचे कर्ज आणखी स्वस्त,  सलग पाचव्यांदा व्याजदरात कपात
SHARES

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) पुन्हा एकदा व्याजदर कपातीची भेट आपल्या ग्राहकांना दिली आहे. एसबीआयने कर्जावरील व्याजदरात ०.१० टक्क्याने घटवले आहेत. त्यामुळे बँकेचे गृह, वाहन आणि वैयक्तिक कर्ज स्वस्त होणार आहे. एसबीआयने सलग पाचव्यांदा व्याजदर कमी केले आहेत.  


ठेवींचे दरही घटले

व्याजदरातील ०.१० टक्क्यांची कपात ही सर्व मुदतीच्या कर्जावर करण्यात आली असल्याचं एसबीआयने म्हटलं आहे. या कपातीनंतर एक वर्ष मुदतीच्या कर्जावरील व्याजदर ८.१५ टक्के झाला आहे. नवीन व्याजदर १० सप्टेंबरपासून लागू होणार आहेत. एसबीआयने २०१९-२० या चालू आर्थिक वर्षात सलग पाच वेळा व्याजदर घटवले आहेत. आता बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदरही घटवले आहेत. रिटेल मुदत ठेवींवरील व्याजदरात ०.२० ते ०.२५ टक्के तर बल्क मुदत ठेवींवरील व्याजदरात ०.१० ते ०.२० टक्के कपात केली आहे. ही कपातही १० सप्टेंबरपासून लागू होणार आहे.हेही वाचा -

पीएनबी, कॅनरा, युनायटेड, युनियनसह १० बँकांचं होणार विलीनीकरण, निर्मला सीतारमण यांची घोषणा

येणार १०० रुपयांची चमकणारी नोट
संबंधित विषय
Advertisement