Advertisement

येणार १०० रुपयांची चमकणारी नोट

रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया (RBI) लवकरच भारतीय बाजारात १०० रुपयांची खास नोट आणणार आहे. ही नोट लवकर न फाटणारी तसंच व्हार्निशमुळं चमकणारी असेल.

येणार १०० रुपयांची चमकणारी नोट
SHARES

रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया (RBI) लवकरच भारतीय बाजारात १०० रुपयांची खास नोट आणणार आहे. ही नोट लवकर न फाटणारी तसंच व्हार्निशमुळं चमकणारी असेल.  

यासाठी बदल

आरबीआयचा वार्षिक अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या अहवालात चलनी नाेटांमध्ये महत्त्वाचे बदल करण्याचं सूचवण्यात आलं आहे. भारतीय बाजारातील बनावट नोटांचा सुळसुळाट रोखण्याचंही आरबीआयने ठरवलं आहे. त्यानुसार सर्व नोटांवर व्हार्निश कोट चढवण्यात येईल. 

व्हार्निशचा कोट

व्हार्निश कोट दिल्यामुळे नोटा लवकरच फाटणार नाहीत. म्हणजेच या नोटांचं आयुष्यही वाढेल. ज्या पद्धतीने आपण घरातील लाकडी फर्निचरवर व्हार्निशचा कोट चढवतो. त्याचप्रमाणे या १०० रुपयांच्या नोटा छापून झाल्यावर त्यावर व्हार्निशचा कोट चढवण्यात येईल. यामुळे या नोटा चमकतील.  

प्रायोगिक तत्वावर

रिझर्व्ह बँकेला दरवर्षी लाखो-कोटी रुपयांच्या खराब, फाटलेल्या नोटा बदलाव्या लागतात. व्हार्निस चढवण्यासाठी इतर नोटांच्या तुलनेत थोडा जास्त खर्च येणार आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर काही नोटांना व्हार्निश कोट देण्यात येईल. हा प्रयोग यशस्वी झाल्यास १०० रुपयांच्या सर्व नोटांना हा कोट लावला जाईल.  

मुंबईत एक नोट क्वालिटी अॅश्युअरन्स प्रयोगशाळा देखील स्थापन करण्यात आली आहे. नोटांच्या गुणवत्तेकडे ही प्रयोगशाळा लक्ष देईल. हेही वाचा-

१० हजारांहून जास्त रक्कम काढताय? एटीएम मागणार ओटीपी

RTGS व्यवहारांचा वेळ १ तासाने वाढला, आरबीआयचा निर्णयसंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा