Advertisement

१० हजारांहून जास्त रक्कम काढताय? एटीएम मागणार ओटीपी

कॅनरा एटीएममधून १० हजार रुपयांहून अधिक रक्कम काढायची असल्यास पासवर्डसोबत ओटीपी क्रमांक देखील टाकावा लागेल.

१० हजारांहून जास्त रक्कम काढताय? एटीएम मागणार ओटीपी
SHARES

एटीएमद्वारे होणारी बँक ग्राहकांची फसवणूक थांबवण्यासाठी कॅनरा बँकेने काही कडक उपाययोजना केल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे एटीएममधून १० हजार रुपयांहून अधिक रक्कम काढायची असल्यास पासवर्डसोबत ओटीपी क्रमांक देखील टाकावा लागेल. 

फसवणुकीचे वाढते प्रकार

रिझर्व्ह बँके (RBI)च्या सूचनेनंतर कॅनरा बँकेने हा ओटीपी बंधनकारक करण्याचा नियम बनवला आहे. कॅनरा बँकेच्या नियमाप्रमाणे इतर बँकाही हा नियम बंधनकारक करण्याची शक्यता आहे. एटीएममध्ये स्कीमर, हँकिंग करून अनेक ग्राहकांची फसवणूक झाल्याचे प्रकार समोर आले आहेत.

एटीएमद्वारे होणाऱ्या फसवणुकीचे प्रकार शक्यताे रात्री ११ ते सकाळी ६ वाजेदरम्यान होतात. त्यामुळे ही फसवणूक टाळण्यासाठी 'स्टेट लेव्हल बँकर्स कमिटी'ने काही शिफारसी सुचवल्या आहेत. या शिफारसीनुसार ग्राहकांना एटीएममधून पैसे काढण्यासाठी वेळेची बंधनं येणार आहेत. उदा. एटीएमद्वारे होणाऱ्या दोन व्यवहारांमध्ये ग्राहकांना ६ ते १२ तासांचं अंतर ठेवावं लागणार आहे.

'इतके' गुन्हे उघड

२०१८-१९ मध्ये दिल्लीत १७९ एटीएम फसवणुकीचे गुन्ही दाखल झाले. महाराष्ट्रात या दरम्यान २३३ गुन्हे दाखल झाले. अलीकडेच कार्डच्या क्लोनिंगचे प्रकारही समोर आहे. २०१८-१९ मध्ये देशभरात एटीएम फसवणुकीचे ९८० प्रकार घडले आहेत. २०१७-१८ मध्ये ही संख्या ९११ होती.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आरबीआयच्या सूचनांचं सर्व बँकांना पालन करायचं आहे. त्यानुसार लवकरच इतर बँकांची त्यादृष्टीने उपाययोजना करतील. ओटीपीचा नियमही लागू करण्यात येईल. 



हेही वाचा-

आर सीटी मॉलमध्ये ओपन होणार IKEAचं शॉप

सेन्सेक्स ७९२ अंकांनी उसळला



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा