सेन्सेक्स ७९२ अंकांनी उसळला

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थव्यवस्थेतील मरगळ दूर करण्यासाठी गेल्या आठवड्यात काही घोषणा केल्या होत्या. या घोषाणांना सकारात्मक प्रतिसाद देत सोमवारी देशांतर्गत शेअर बाजारांनी तेजी नोंदवली.

SHARE

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थव्यवस्थेतील मरगळ दूर करण्यासाठी गेल्या आठवड्यात काही घोषणा केल्या होत्या. या घोषाणांना सकारात्मक प्रतिसाद देत सोमवारी देशांतर्गत शेअर बाजारांनी तेजी नोंदवली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ७९२.९६ अंकांनी उसळून ३७, ४९७ वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी २२८ अंकांची वाढ नोंदवून ११,०५७ वर बंद झाला. 

उत्साह परतला

सीतारमण यांनी अर्थसंकल्पात फॉरेन पोर्टफोलियो इन्वेस्टमेंट (FPI) च्या मिळकतीवर आयकर सरचार्ज लावण्याचा निर्णय मागे घेतला. सोबतच देशांतर्गत गुंतवणूकदारांसाठीदेखील आयकर सरचार्ज वाढवण्याचा निर्णय रद्द केला. त्याचबरोबर वाहन उद्योग, एनबीएफसी, गृहकर्ज, वाहन कर्ज आणि रेपो रेट यासंबंधीत बऱ्याच मोठ्या घोषणा केल्या. या घोषणांमुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह परतला. परिणामी शेअर बाजारात वाढ झाल्याची पाहायला मिळाली. 

'या' सेक्टरमध्ये वाढ

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ६६२ अंकाच्या वाढीसह ३७ हजार ३६३ वर उघडला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १७० अंकाच्या वाढीसह ११ हजारांवर उघडला. त्यानंतर थोड्याफार घसरणीसह त्यात वाढच होत गेली खासकरून बँकिंग सेक्टरच्या शेअर्समध्ये १ हजार अंकांपेक्षा जास्त वाढ पाहायला मिळाली. बँकिंग सेक्टरचे शेअर्स १०८५ अंकांनी उसळून ३१,५३० वर बंद झाले. निफ्टीत देखील बँकिंग सेक्टरच्या शेअरमध्ये ९९२ अंकांची वाढ होऊन ते ३७,९५१ वर बंद झाले.

सोबतच कॅपिटल गुड्स (४६७ अंक), कंझ्युमर ड्युरेबल्स (३३२ अंक), आॅइल अँड गॅस (१८७ अंक), फायनांन्स (२२६ अंक), पीएसयू (१३१ अंक) वाढीसह बंद झाले.हेही वाचा-

भाग ३ : 'हे' आहेत म्युच्युअल फंडांतील गुंतवणुकीचे बहुपर्याय

भाग ५ : डीमॅट - शेअर बाजारात प्रवेशाचा मार्गसंबंधित विषय
ताज्या बातम्या