एपीएमसीतील भाजी मार्केट खारघरला हलवणार

वाशीतील एपीएमसी मार्केटमधील भाजीपाला आणि फळ मार्केट खारघरच्या सेंट्रल पार्कजवळ असलेल्या मोकळ्या मैदानावर तात्पुरतं हलवण्यात येणार आहे.

एपीएमसीतील भाजी मार्केट खारघरला हलवणार
SHARES

वाशीतील एपीएमसी मार्केटमधील भाजीपाला आणि फळ मार्केट खारघरच्या सेंट्रल पार्कजवळ असलेल्या मोकळ्या मैदानावर तात्पुरतं हलवण्यात येणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन एपीएमसी मार्केट प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.  वारंवार सांगून देखील एपीएमसी मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही. त्यामुळे येथील गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने भाजीपाला आणि फळ मार्केट हलवण्यात येत आहे. 


सोमवारी कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, बाजार समिती सचिव अनिल चव्हाण आणि एपीएमसीच्या इतर अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. एपीएमसी मार्केटमध्ये सोमवारपासून किरकोळ खरेदीदारांना आत सोडण्यावर बंदी घातलण्यात आली आहे. फक्त होलसेल खरेदीदारांना आत सोडण्यात येत आहे.


एपीएमसी मार्केटमधील भाजीपाला आवारात फक्त ३०० गाड्यांना सोडण्यात येणार आहे. जर नियमांचे पालन केले नाही तर परवाने रद्द करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये एपीएमसी मार्केटमध्ये असलेले सर्व घाऊक व्यापारी आणि इतर घटकांनी जर हे नियम तोडले तर भाजीपाला आणि फळ मार्केटच्या जवळपास २००० व्यापाऱ्यांना खारघर येथील सेंट्रल पार्कच्या जवळ असलेल्या ५० एकर भूखंडावर पाठवण्यात येणार आहे. या मैदानावर तात्पुरत्या स्वरुपात मार्केट उभं करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. हेही वाचा -

भीतीनं सिलिंडर बुक करण्याची गरज नाही- इंडियन ऑईल

Bombay IITकडून अॅपची निर्मिती, 'क्वॉरन्टाईन' व्यक्तींवर ठेवणार लक्ष
संबंधित विषय