SHARE

मुंबई - अर्थसंकेतकडून 18 ऑक्टोबर रोजी 'उद्योजकांची दिवाळी पहाट' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मुंबई शेअर बाजाराच्या बीएसई इंटरनॅशनल कन्व्हेंशन हॉल येथे सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत होणार आहे. या कार्यक्रमाची माध्यम प्रायोजक 'मुंबई लाइव्ह' आहे.

आज लघू आणि मध्यम उद्योजक उद्योग/व्यवसाय क्षेत्रात खंबीरपणे उभा राहू लागला आहे व त्याला अनेक संस्था कारणीभूत आहेत. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, दलित चेंबर ऑफ कॉमर्स, ख्रिश्चन चेंबर ऑफ कॉमर्स, TSSIA, IMC, FICCI, BMA, NSIC, मराठी व्यापारी व्यावसायिक मित्र मंडळ अशा विविध संस्था उद्योजक विकासासाठी कार्यरत आहेत. अर्थसंकेतने आयोजित केलेल्या बीएसई उद्योजकांची दिवाळी पहाट २०१६ या कार्यक्रमांतर्गत या सर्व संस्था गेली तीन वर्षे एका व्यासपीठावर एकत्र येत आहेत.
ज्या प्रमाणे बिझनेस क्लब्ज आहेत त्यांचे विशेष उपक्रम ते राबवित असतात तसेच प्रत्येकाची विशेष अशी ओळख आहे. यावर्षी अर्थसंकेततर्फे प्रत्येक बिझनेस क्लबच्या सदस्यांचा सत्कार करण्याचे ठरले आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या