एटीएममधून पैसे काढणं अजून महाग होणार?

एटीएम ट्रान्झॅक्शनचे नियम रिझर्व्ह बँकेने कडक केले असून हे नियम जुलैपासून लागू होणार आहेत. या नियमांमुळे बँकांचा खर्च वाढणार असल्यानं बँकांनी एटीएम ट्रान्झॅक्शनच्या दरात वाढ करण्याचं ठरवल्याचं समजत आहे.

SHARE

मुंबई वगळता राज्यासह देशातील अनेक ठिकाणच्या एटीएममध्ये सध्या खडखडाट असतानाच एटीएममधून पैसे काढणं आता आणखी महागणार आहे. एटीएम ट्रान्झॅक्शनचे नियम रिझर्व्ह बँकेने कडक केले असून हे नियम जुलैपासून लागू होणार आहेत. या नियमांमुळे बँकांचा खर्च वाढणार असल्यानं बँकांनी एटीएम ट्रान्झॅक्शनच्या दरात वाढ करण्याचं ठरवल्याचं समजत आहे.


अतिरिक्त भार २० रुपये होणार?

आत्तापर्यंत एटीएममधून ५ पेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यास ग्राहकांना १५ रुपयांपर्यंत अतिरिक्त पैसे द्यावे लागत होते. मात्र, नव्या नियमांच्या सक्तीमुळे बँका या चार्जेसमध्ये वाढ करण्याची शक्यता आहे. यापुढे १५ रुपयांऐवजी २० रुपये मोजावे लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, ही दरवाढ नेमकी कधी होणार? हे अजून स्पष्ट झालेलं नाही.


नव्या नियमांमुळे बँकांच्या खर्चात वाढ

ट्रान्झॅक्शनच्या नव्या नियमांनुसार कॅश मॅनेजमेंट कंपन्यांकडे कमीत कमी ३०० कॅश व्हॅन, प्रत्येक कॅश व्हॅनमध्ये एक ड्रायव्हर, दोन बंदुकधारी आणि दोन कर्मचारी असणं बंधनकारक आहे. तसेच, गाडीत जीपीएस, भू मॅपिंग, नजीकच्या पोलिस ठाण्याचा पत्ता या सर्व बाबी असणंही बंधनकारक असून प्रशिक्षित व्यक्तीचीच एटीएममध्ये पैसे भरण्याबरोबरच एटीएम हाताळण्यासाठी नियुक्ती करणं बंधनकारक असणार आहे.


वाढीव खर्च ग्राहकांच्या माथी!

या नव्या नियमांची अंमलबजावणी करताना बँकांचा खर्च वाढणार आहे. त्यामुळे हा खर्च साहजिकच बँका ग्राहकांच्या माथी मारणार! त्यानुसार बँकांनी ट्रान्झॅक्शनच्या दरात ३ ते ५ रुपयांची वाढ करण्याची मागणी केली आहे. असं झाल्यास एटीएममधून पैसे काढणं महागणार आहे. दरम्यान जुलैपासून रिझर्व्ह बँकेचे नवे नियम लागू होणार असल्याने जुलैमध्येच ट्रान्झॅक्शनचे नवे दरही लागू होण्याची शक्यता आहे.हेही वाचा

एटीएम वापरताय? मग तुमचीही अशीच फसवणूक होऊ शकते!


संबंधित विषय
ताज्या बातम्या