SHARE

मुंबई - नोटबंदीमुळे प्रचंड मनस्ताप सहन कराव्या लागलेल्या सामान्यांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआयनं दिलासा दिला आहे. येत्या 1 फेब्रुवारीपासून एटीएममधून दिवसाला ठराविक पैसे काढण्याची मर्यादा काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे आता तुम्ही एटीएममधून दिवसाला कितीही रक्कम काढू शकता. मात्र यामध्ये प्रत्येक बँकेनुसार दिवसाला पैसे काढण्याची मर्यादा बदलू शकते. हा निर्णय घेतानाच आठवड्याला पैसे काढायची मर्यादा 24 हजार इतकीच ठेवण्यात आली आहे. याशिवाय बँकांमधून प्रत्यक्ष पैसे काढण्याची मर्यादाही आठवड्याला 24 हजार करण्यात आली आहे.

याशिवाय चालू अर्थात करंट अकाऊंटमधून पैसे काढण्याच्या मर्यादा बदलण्यात आल्या आहेत. आरबीआयने जारी केलेल्या नव्या नियमावलीनुसार करंट अकाऊंटमधून पैसे काढण्याची मर्यादा काढून घेण्यात आली आहे. त्यामुळे आता करंट अकाऊंटमधून कितीही रक्कम काढता येऊ शकते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या