डबेवाल्यांकडून स्वदेशीचा नारा

 Lower Parel
डबेवाल्यांकडून स्वदेशीचा नारा

लोअर परेल - भारतीयांनी मेड इन चायना वस्तु खरेदीच करू नये, त्या एेवजी भारतीय बनावटीच्या वस्तु खरेदी करा आणि भारताची अर्थव्यवस्था मजबूत करा, असा संदेश मुंबईच्या डबेवाल्यांनी दिला. लोअर परेल येथे स्व:खर्चाने पत्रके छापून डब्याच्या माध्यमांतून डब्बेवाल्यांनी संदेश दिला.

दसरा- दिवाळी हे मोठे सण जवळ आले आहेत या सणाला चीनी बनावटीच्या खुप वस्तु बाजारात येणार आहेत, या पार्श्वभूमीवर चीनची आर्थिक साम्राज्य कमकूवत करण्यासाठी आणि भारताचे आर्थिक साम्राज्य मजबूत करण्यासाठी हा उपक्रम राबवण्याचा निर्णय डबेवाल्यांनी घेतला आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब करवंदे आणि पदाधिकारी विठ्ठल सावंत, अशोक कुंभार , अर्जुन सावंत,  सुभाष तळेकर उपस्थित होते.

Loading Comments