SHARE

मुंबई - बँकांचे कर्ज बुडवणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी केंद्र सरकाराने एक पाऊल पुढे टाकले आहे. आधी बँकांचे कर्ज घ्यायचे आणि नंतर बुडवायचे अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी तसेच कर्ज वसूल करण्यासाठी केंद्र सरकार नवा कायदा आणण्याच्या विचारात असल्याची घोषणाच अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केली. बँकाचं कर्ज घेऊन परदेशात पळून जाणाऱ्यांची संपत्ती जप्त करण्याची ठोस तरतूद या कायद्यात करण्यात येणार अाहे.

विजय मल्ल्यादेखील भारतीय बँकांचे पैस घेऊन ब्रिटनला पळाला आहे. यावरून सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका होतेय. त्यामुळे यापुढे असे प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून केंद्र सरकार आता कडक कायदा करण्याच्या तयारीत आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या