Advertisement

बँक ऑफ महाराष्ट्रच्या 51 शाखा होणार बंद


बँक ऑफ महाराष्ट्रच्या 51 शाखा होणार बंद
SHARES

बँक ऑफ महाराष्ट्रच्या शहरी भागातील 51 शाखांना टाळे लागणार आहे. कारण या बँकेच्या शहरी भागातील 51 शाखांपासून कोणताच फायदा मिळत नसल्यामुळे या शाखा लवकरच बंद होणार असल्याची माहिती बँकेच्या मुख्यालयातर्फे देण्यात आली आहे.


म्हणून 'या' शाखा होणार बंद

बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेच्या देशभरात सुमारे 1 हजार 900 शाखा आहेत. यापैकी शहरी भागांमधील 51 शाखांपासून कोणताच फायदा होत नसल्याने या शाखा लवकरच बंद होणार आहेत. या शाखा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आयएफएससी कोड आणि एमआयसीआर कोडही बंद करण्यात येतील. शिवाय या शाखांमध्ये असलेली खातेधारकांची सर्व प्रकारची खाती इतर शाखांमध्ये विलिनीकरण करण्यात येणार आहेत. तसेच खातेधरकांनी आपली खाती आणि या खात्यांचे चेकबुक येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत बँकेत जमा करावे असं बँकेतर्फे कळवण्यात आलं आहे.

संबंधित बँक शाखेतील खाते धारकांना नवीन आयएफएससी कोड आणि एमआयसीआर कोड देण्यात आले आहे. त्यामुळे त्या खातेधारकांनी आपले पुढील व्यवहार या नवीन कोडच्या माध्यमातून करावे, असं बँक ऑफ महाराष्ट्रकडून सांगण्यात आलं आहे.


येथील शाखा होणार बंद

ठाणे (7), मुंबई (6), पुणे (4), नाशिक आणि बंगळुरू (प्रत्येकी 3), अमरावती, लातूर, औरंगाबाद, जळगाव, नागपूर, सातारा, हैदराबाद, चेन्नई (प्रत्येकी 2), नोएडा, कोलकाता, चंदीगढ, रायपूर, गोवा, सोलापूर, कोल्हापूर, (प्रत्येकी 1)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा