Coronavirus cases in Maharashtra: 230Mumbai: 92Pune: 30Islampur Sangli: 25Nagpur: 16Pimpri Chinchwad: 12Kalyan: 6Ahmednagar: 5Thane: 5Navi Mumbai: 4Yavatmal: 4Vasai-Virar: 4Satara: 2Panvel: 2Kolhapur: 2Ulhasnagar: 1Aurangabad: 1Ratnagiri: 1Sindudurga: 1Pune Gramin: 1Godiya: 1Jalgoan: 1Palghar: 1Buldhana: 1Nashik: 1Gujrat Citizen in Maharashtra: 1Total Deaths: 10Total Discharged: 39BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

लॉकडाऊनमुळे जीडीपी २.५ टक्के राहण्याची शक्यता

कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून देशभरात २१ दिवसाचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. पण या लॉकडाऊनचा आता देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

लॉकडाऊनमुळे जीडीपी २.५ टक्के राहण्याची शक्यता
SHARE

कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून देशभरात २१ दिवसाचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. पण या लॉकडाऊनचा आता देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनमुळे भारताच्या विकासदरात मोठी घसरण होण्याचा अंदाज बार्कलेजने वर्तवला आहे. तीन आठवड्याच्या लॉकडाऊनमुळे २०२० वर्षात भारताचा जीडीपी विकासदर २.५ टक्क्यांपर्यंत घसरु शकतो असे म्हटले आहे. सुरुवातीला भारताने २०२० मध्ये ४.५ टक्के वाढीचा अंदाज वर्तवला होता. अनेक रेटिंग संस्था तसेच आयएमएफ आणि जागतिक बँकेसारख्या आर्थिक संस्थांनीही भारतीय अर्थव्यवस्थेसाठी निराशाजनक अंदाज वर्तवला आहे. मुडीजनेही जी-२० देशांमध्ये मंदीचा अंदाज वर्तवला आहे. 

ब्रिटनमधील आर्थिक कंपनी बार्कलेजने आपल्या अहवालात लॉकडाऊनचा कालावधी आणखी एक आठवडा वाढवला जाऊ शकतो, असे म्हटले आहे. लॉकडाऊन चार आठवड्याचा असेल. त्यानंतर ८ आठवडे आंशिक लॉकडाऊनही लागू होईल. यामुळे अर्थव्यवस्थेचे १२० अब्ज डॉलरचे नुकसान होऊ शकते. तीन आठवड्याच्या लॉकडाऊननेच ९० अब्ज डॉलरचे नुकसान होऊ शकते. हे नुकसान जीडीपीच्या ४ टक्के आहे. अशा पद्धतीने जीडीपीचा दर २ टक्क्यांनी कमी होऊ शकतो. त्यामुळे बार्कलेने भारताचा विकास दराचा अंदाज ४.५ टक्क्यांनी घटवून २.५ टक्के केला आहे. जर असे झाले तर १९९२ च्या आर्थिक सुधारणांनंतरचा हा सर्वांत कमी विकासदर असेल.

जागतिक बँकेच्या मते, भारतीय अर्थव्यवस्था १९९१ मध्ये १.०६ टक्क्यांच्या वेगाने  वाढली होती. त्यानंतर देशात आर्थिक सुधारणांमुळे वेग आला. २०२०-२१ साठी जागतिक बँकेने विकासदर ३.५ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.हेही वाचा -

3 महिन्यांचं रेशन मोफत मिळणार, निर्मला सीतारामन यांची घोषणा

Coronavirus Updates: १४ एप्रिलपर्यंत लोकल बंद
संबंधित विषय
ताज्या बातम्या