आभास वाढता वाढता वाढे! 'बिटकाॅइन'चं मूल्य ९.७५ लाखांवर

बुधवारी 'बिटकाॅइन'चं मूल्य १२ हजार डाॅलर एवढं होतं, त्यात वाढ होऊन ते १५ हजार डालरपर्यंत पोहोचलं आहे. मात्र सद्यस्थितीत भारतातील कुठल्याही नियमांतर्गत 'बिटकाॅइन'मधील गुंतवणूक येत नसल्याने रिझर्व्ह बँकेने या आभासी चलनात गुंतवणूक करणं धोक्याचं असल्याचं स्पष्ट केलं आहे.

Mumbai
आभास वाढता वाढता वाढे! 'बिटकाॅइन'चं मूल्य ९.७५ लाखांवर
आभास वाढता वाढता वाढे! 'बिटकाॅइन'चं मूल्य ९.७५ लाखांवर
आभास वाढता वाढता वाढे! 'बिटकाॅइन'चं मूल्य ९.७५ लाखांवर
See all
मुंबई  -  

'बिटकाॅइन' या 'व्हर्च्युअल क्रिप्टोकरन्सी'ने गुरूवारी १५ हजार डाॅलर अर्थात ९.७५ लाख रुपयांपर्यंत मजल मारली. मागच्या २४ तासांत 'बिटकाॅइन'च्या मूल्यात २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सद्यस्थितीत भारतातील कुठल्याही नियमांतर्गत 'बिटकाॅइन'मधील गुंतवणूक येत नसल्याने रिझर्व्ह बँकेने या आभासी चलनात गुंतवणूक करणं धोक्याचं असल्याचं स्पष्ट केलं आहे.


१४०० टक्क्यांनी वाढ

बुधवारी 'बिटकाॅइन'चं मूल्य १२ हजार डाॅलर एवढं होतं, त्यात वाढ होऊन ते १५ हजार डालरपर्यंत पोहोचलं आहे. २०१७ च्या सुरूवातीला 'बिटकाॅइन'चं मूल्य अवघं १ हजार डाॅलर होतं. पण वर्षभरात त्यात १४०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.१.९ लाखांची कमाई

बिटकॅइनचं मूल्य २४ तासांत १२ हजार डालरवरून १४४०० डालरवर गेल्याने बिटकॅइनमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांनी दिवसभरात १.९ लाख रुपये कमावले आहेत. सद्यस्थितीत 'बिटकाॅइन'ची मार्केट व्हॅल्यू २३० अब्ज डाॅलर (१४.९५ लाख कोटी रुपये) पर्यंत पोहोचल्याचं म्हटलं जात आहे. हे मूल्य काही देशांच्या अर्थव्यवस्थेपेक्षाही जास्त आहे.


कायदेशीर मूल्य नाही

अर्थतज्ज्ञांच्या मते, या व्हर्च्युअल करन्सीला कुठलीही 'लिगल व्हॅल्यू' अर्थात कायदेशीर मूल्य नाही. त्यामुळे या चलनाने तुम्ही कुठलाही आर्थिक व्यवहार करू शकत नाही. कारण या गुंतवणुकीचा हिशेब 'ब्लाॅकचेन टेक्नाॅलाॅजी'ने ठेवण्यात येतो. या टेक्नालाॅजीचा कोड तोडण्यास अद्याप कुणालाच यश न आल्याने हे चलन नेमकं कुणी तयार केलं हे कळू शकलेलं नाही.


गुंतवणूक करू नका- आरबीआय

जगभरात काही देशांमध्ये 'बिटकाॅइन'सारख्या आभासी चलन व्यवस्थेतील गुंतवणूक वाढत असली, तरीही भारतात अशा गुंतवणुकीला कायदेशीर मान्यता नाही. त्यामुळे अशा चलनात गुंतवणूक करणं धोक्याचं ठरू शकतं, अशी स्पष्ट सूचना आरबीआयने २०१३ आणि फेब्रुवारी २०१६ गुंतवणूकदारांना दिली होती.'बिटकाॅइन'सारख्या व्हर्च्युअल करन्सीत ट्रेड करण्यासाठी कुठल्याही कंपनीला लायसन्स दिलं नसल्याचं रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या चलनात गुंतवणूक केल्यास ही गुंतवणूक अनधिकृत आणि धोक्याची ठरू शकेल.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.