'एनएसई'तील बिघाडाने ‘बीएसई’ मालामाल, 1.45 लाख कोटींचा फायदा


SHARE

राष्ट्रीय शेअर बाजारा (एनएसई) त झालेल्या तांत्रिक घोटाळ्याचा पुरेपुर लाभ उठवत मुंबई शेअर बाजाराने (बीएसई) सोमवारी रेकोर्डब्रेक कामगिरी केली. मोठा विस्तार असल्याने देशातील सर्वाधिक गुंतवणूक राष्ट्रीय शेअर बाजारात होते. परंतु, ‘एनएसई’चे व्यवहार तीन तास ठप्प झाल्याने गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा ‘बीएसई’कडे वळवला. यामुळे, ‘बीएसई’तील ट्रेडिंग अडीचपट वाढून गुंतवणूकदारांना 1.45 लाख कोटींचा फायदा झाला.

यापूर्वी, 7 जुलै रोजी बीएसईची मार्केट कॅप 1,28,15,173 लाख कोटी होती. ती सोमवारी 1.45 लाख कोटी रुपयांनी वाढून 1,29,60,706 लाख कोटी रुपये झाली.

एवढेच नव्हे, तर गुंतवणूकदारांच्या वाढलेल्या ट्रेडिंगच्या जोरावर ‘मुंबई शेअर बाजारा’चा निर्देशांक ‘सेन्सेक्स’ने 355 अंकांनी उसळी खात ऑल टाईम हाय 31,715 रेकॉर्ड नोंदवला. यापूर्वी सेन्सेक्सने 22 जून रोजी 31,522 अंकांपर्यंत मजल मारली होती. तर, ‘एनएसई’च्या निफ्टीनेही 105 अंकांची वाढ नोंदवून 9771 वर मजल मारली.


'एनएसई' डेटा बॅकअप घेण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा होती. परंतु अधिकृतरित्या काहीही सांगण्यात न अाल्याने शुक्रवारपर्यंत व्यवहार सुरळीत होते. पण अचानक झालेल्या तांत्रिक बिघाडाने काही तासांसाठी व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले. या तांत्रिक बिघाडाचा ‘इन्ट्रा डे’ चे व्यवहार करणाऱ्या गुंतवणूकदारांना वैयक्तिकरित्या कुठलाही फटका बसलेला नाही. ‘एनएसई’चा व्याप देशभरात पसरलेला आहे. त्यामुळे ‘बीएसई’च्या तुलनेत ‘एनएसई’मध्ये दिवसभरात मोठ्या संख्येने शेअर्सची खरेदी-विक्री होते. उदाहरणार्थ दिवसभरात 10 लाख शेअर्सची खरेदी ‘बीएसई’त होत असली, तर त्याच वेळेस 50 लाख शेअर्सची खरेदी ‘एनएसई’त होते. ‘एनएसई’वरील व्यवहार थांबताच गुंतवणूकदारांनी ‘बीएसई’तील गुंतवणुकीला प्राधान्य दिले.
- प्रसाद शुक्ला, प्रोपरायटर, मीडास इन्व्हेस्टमेंट


‘एनएसई’ तील व्यवहार सकाळपासूनच धिम्या गतीने सुरू असल्याने मी ‘बीएसई’तील ‘इंट्रा ड्रे’ वर लक्ष्य केंद्रीत केले. दिवसअखेर मला चांगला फायदा झाला. गुंतवलेल्या रकमेवर मला 3 ते 4 पट परतावा मिळाला.
- राजेश भोसले, गुंतवणूकदार


साडेबारानंतर बिघाड दूर

सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाल्याने सकाळी 9.55 वाजता सर्वात पहिल्यांदा ‘एनएसई’वरील ‘फ्युचर्स अँड ऑप्शन्स’ म्हणजेच ‘एफ अँड ओ’ आणि कॅश सेगसेंटममधील ट्रेडिग थांबवण्यात आली. तांत्रिक कारणांमुळे ट्रेडिंग थांबवल्याचे कारण ‘एफएसई’ने दिले. त्यानंतर 10.45 आणि पुन्हा 11.15 वाजता प्रयत्न करूनही ट्रेडिंग सुरू होऊ शकली नाही. त्यानंतर अखेर 12.30 वाजेनंतर तांत्रिक बिघाड दूर होऊन व्यवहार पूर्ववत झाले.


तांत्रिक बिघाडामुळे शेअर बाजार व्यवहार पूर्णपणे ठप्प होण्याची ही काही पहिली घटना नाही. यापूर्वीही बऱ्याचदा अशा घटना घडल्या आहेत.


  • नोव्हेंबर 2010 मध्ये बीएसईतील व्यवहार अडीच तासांसाठी ठप्प
  • डिसेंबर 2012 मध्ये एनएसईवरील ट्रेडिंग 15 मिनिटे थांबवण्यात आले
  • 5 ऑक्टोबर 2012 रोजी एम.के. ग्लोबल कंपनीच्या चुकीच्या ऑर्डरमुळे निफ्टी 900 अंकांनी घसरला
  • 9 एप्रिल 2014 रोजी बीएसईवर सुरूवातीच्या सत्रात 15 ते 20 शेअर्सच्या किमती अपडेट नव्हत्या झाल्या
  • 3 जुलै 2014 रोजी नेटवर्क आऊटेजमुळे बीएसईवरील ट्रेडिंग थांबवले
  • 11 जुलै 2014 रोजी सकाळच्या सत्रात काही मिनिटांसाठी ट्रेडिंग बंद


अर्थ मंत्रालयाने मागितला अहवाल

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने भारतीय भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवणारी सर्वोच्च संस्था ‘सिक्युरिटी अँड एक्स्चेज बोर्ड ऑफ इंडिया’ (सेबी) आणि ‘एनएसई’ कडून या तांत्रिक गडबडीबाबतचा अहवाल मागितला आहे. ‘सेबी’ने तांत्रिक कारणांमुळे ट्रेडिंग धिमी झाल्याचे म्हटले. तर एनएसईने सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाल्याचे कारण दिले. याप्रकरणी अर्थ मंत्रालय देखील स्वतंत्रपणे तपास करणार असल्याचे कळते.हे देखील वाचा -

तांत्रिक बिघाडाने NSE पडले बंद, 3 तासानंतर व्यवहार सुरूडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
ताज्या बातम्या