तांत्रिक बिघाडाने NSE पडले बंद, 3 तासानंतर व्यवहार सुरू

  BKC
  तांत्रिक बिघाडाने NSE पडले बंद, 3 तासानंतर व्यवहार सुरू
  मुंबई  -  

  तांत्रिक बिघाडामुळे नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई) चा व्यवहार सोमवारी सकाळी ठप्प झाला होता. गुंतवणूकदारांना कोणतीच माहिती मिळत नसल्याने त्यांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले. तब्बल तीन तासानंतर शेअरबाजार पुन्हा सुरू झाला. पण तोपर्यंत गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते.

  'एनएसई'च्या सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाल्याने सोमवारी सकाळी 9.30 वाजल्यापासून ते 12 वाजेपर्यंत ट्रेंडिग बंद होते. त्यामुळे शेअरच्या किंमतींबाबत गुंतवणूकदारांना कोणतीच माहिती मिळत नव्हती.

  दरम्यान समस्येचे निवारण करण्याचे काम सुरू असून दुपारी 12.30 वाजेपर्यंत शेअरबाजार पुन्हा सुरू होईल, अशी माहिती एनएसईने दिली होती. शेअरबाजार सुरू झाल्यानंतर सेन्सेक्सने 235 अंकांची उसळी घेतली.


  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.