Advertisement

गौतम सिंघानियांचा रेमंड अॅपेल्सच्या चेअरमनपदाचा राजीनामा

गौतम सिंघानिया यांनी राजीनाम्यानंतर सांगितलं की, कंपनीतील चांगल्या कामकाजावर माझा विश्वास आहे. निर्विक सिंहची निवड करण्यात आल्याबद्दल मला आनंद आहे. या संधीचा ते फायदा उचलतील अशी अपेक्षा आहे.

गौतम सिंघानियांचा रेमंड अॅपेल्सच्या चेअरमनपदाचा राजीनामा
SHARES

उद्योजक गौतम सिंघानिया यांनी सब्सिडरी कंपनी रेमंड अॅपेरल्सच्या चेअरमनपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी तात्पुरत्या स्वरूपात निर्विक सिंह यांना नाॅन एक्झिक्युटीव्ह चेअरमन पदावर बसवण्यात आलं आहे. राजीनाम्यानंतरही गौतम सिंघानिया कंपनीच्या संचालक मंडळात कायम राहतील.

वडीलांसोबत तणाव

विजयपत सिंघानिया यांचं आजीवन चेअरमनपद काढून घेण्यात आलं होतं. त्यावरून काही दिवसांपूर्वी रेमंड समूहाचे संस्थापक विजयपत सिंघानिया आणि त्यांचे चिरंजीव गौतम सिंघानिया यांच्यात तणाव निर्माण झाला होता.

निर्विक सिंहची निवड

गौतम सिंघानिया यांनी राजीनाम्यानंतर सांगितलं की, कंपनीतील चांगल्या कामकाजावर माझा विश्वास आहे. निर्विक सिंहची निवड करण्यात आल्याबद्दल मला आनंद आहे. या संधीचा ते फायदा उचलतील अशी अपेक्षा आहे.

निर्विक सिंह मार्केटिंग आणि कम्युनिकेशन इंडस्ट्रीत काम केलं असून ते सद्यस्थितीत ग्रे ग्रुपचे चेअरमन आणि सीईओ आहेत. लिप्टन इंडिया, युनिलिव्हर कंपनीत काम केल्याचा अनुभव आहे.

रेमंड अॅपेरल्स अंतर्गत पर्क एव्हेन्यू, कलर प्लस, पार्क्स, रेमंड रेडी टू वेअर इ. ब्रँड येतात.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा