ताक प्या, पेटीएमनं पैसे द्या...


  • ताक प्या, पेटीएमनं पैसे द्या...
SHARE

नरिमन पॉइंट - केंद्र सरकारनं केलेल्या नोटाबंदीच्या घोषणेनंतर डिजिटल पेमेंट घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. डिजिटल पेमेंट स्वीकारणारे आता फक्त मोठ्या घाऊक दुकानदार, मॉलपुरते मर्यादित न राहता रस्त्यावर ताक विकणाराही आता पेटीएम मोबाइल वॉलेटचा वापर करू लागलाय. नरिमन पॉइंट परिसरात मधुर ताक विक्रेते म्हणून ओळखले जाणारे लक्ष्मण सोनावणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ई-चलन वापरा या आवाहनाला पाठिंबा देत पेटीएमचा वापर सुरू केलाय.

नरिमन पॉइंट परिसरात अनेक जण नोकरी-व्यवसाय तसंच शासकीय कामकाजासाठी येत असतात आणि नकळत त्यांची पावलं मधुर ताक विक्री गाडीकडे वळतात. नरिमन पॉइंट परिसरात लक्ष्मण सोनावणे चार वर्षांपासून एका गाडीवर ताक विकण्याचा व्यवसाय करतात. नोटंबदीमुळे त्यांच्या व्यवसायावरही संक्रात आली होती. पण पेटीएम सुविधा सुरू करून त्यांनी या अडचणीवर मात केली आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या