Advertisement

Corona effect: डेटॉल- लाइफबॉयमध्ये लागलं भांडण

लाइफबॉय साबण निर्माता हिंदुस्तान युनिलिव्हर आणि डेटॉलचे उत्पादक रेकिट बेन्कीझर या दोन्ही कंपन्यांनी एकमेकांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे.

Corona effect: डेटॉल- लाइफबॉयमध्ये लागलं भांडण
SHARES

जगात सध्या कोरोनाचा कहर आहे, तर भारतात या परिस्थितीत दोन मोठ्या कंपन्यांनी एकमेकांशी लढा दिला आहे. यापैकी एका कंपनीचा दावा आहे की त्यांचं उत्पादन चांगले आहे, तर दुसरी कंपनी दावा करीत आहे की त्यांचे उत्पादन खराब असल्याची प्रसिद्धी दुसऱ्या कंपनीने केली आहे.  

लाइफबॉय साबण निर्माता हिंदुस्तान युनिलिव्हर आणि डेटॉलचे उत्पादक रेकिट बेन्कीझर या दोन्ही कंपन्यांनी एकमेकांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे.  आपली उत्पादने अधिक चांगली आहेत असे म्हणत या दोन्ही कंपन्या समोरासमोर उभ्या ठाकल्या आहेत. खरं तर, कोरोना विषाणूने भारतात प्रवेश केल्यापासून, हात धुण्यासाठी साबण आणि हँडवाॅशची मागणी देशभरात वाढली आहे. यानंतर लाइफबॉय साबण निर्माता हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (एचयूएल) ने डेटॉल निर्माता रेकिट बेन्कीझरवर आरोप केला की डेटॉलने केलेल्या जाहिरातीमध्ये त्यांनी असे म्हटले आहे की लाइफबॉय साबण डेटॉल हँडवाॅशपेक्षा निकृष्ट आहे.  डेटॉलने हात धुणे खूप फायदेशीर आहे. यानंतर हिंदुस्तान युनिलिव्हरने डेटॉलच्या विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आणि एक कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली.

डेटॉल जाहिरात खोटा दावा करत आहेत. साबणाने हात धुणे त्यांच्यासाठी सुरक्षित नाही अशी खोटी माहिती लोकांना देत आहे, असं हिंदुस्तान युनिलिव्हरने म्हटलं आहे. तर डेटॉल कंपनीने त्यांच्या जाहिरातीमध्ये कोणत्याही साबणाचे नाव नसल्याचे सांगितले. लाइफबॉय कंपनीने म्हटले आहे की, साबण आणि पाणी नसताना हात धुण्यासाठी हँडवाॅशचा वापर केला जाऊ शकतो.  परंतु डेटॉल आपल्या जाहिरातींमध्ये असे दर्शवित आहे की डेटॉल हँडवॉश हा हात धुण्याचा सर्वात सुरक्षित मार्ग आहे आणि साबणाने हात धुताना जंतूपासून संपूर्ण संरक्षण प्रदान केली जाऊ शकत नाही.

याप्रकरणी सुनावणी करताना न्यायमूर्ती के.आर. श्रीराम म्हणाले की, डेटॉलच्या 12 मार्चच्या जाहिरातीमध्ये लाइफबॉय साबणचा ट्रेडमार्क आहे आणि डेटॉल जंतूंपासून 10 पट अधिक सुरक्षा देते. ही जाहिरात डब्ल्यूएचओच्या मार्गदर्शक तत्त्वाचा देखील चुकीचा अर्थ लावत आहे, त्यामुळे कंपनीला त्याची जाहिरात थांबवावी लागेल. तर त्याच वेळी डेटोलच्या वतीने त्यांचे वकील म्हणाले की, हिंदुस्थान युनिलिव्हर 12 मार्च रोजी टीव्हीवर दाखविलेला साबण लाइफबॉय असल्याचे सिद्ध करू शकला नाही, त्यामुळे नुकसान भरपाईचा प्रश्नच उद्भवत नाही.


हेही वाचा

कनिका कपूरची दुसरी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

Coronavirus : कोरोना स्टॉप करोना, बॉलिवूडची मोहीम




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा