Advertisement

स्टेट बँकेच्या अध्यक्षपदी दिनेश खारा

२०१७ मध्ये खारा एसबीआयच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते. मात्र त्यावेळी रजनीश कुमार यांची निवड झाली. आता तीन वर्षांनी एसबीआयचे नेतृत्व करण्याची संधी खारा यांना मिळाली आहे.

स्टेट बँकेच्या अध्यक्षपदी दिनेश खारा
SHARES

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या (एसबीआय) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदी दिनेश खारा यांची निवड करण्यात आली आहे. मावळते अध्यक्ष रजनीश कुमार यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ मंगळवारी ६ ऑक्टोबर रोजी संपला. त्यानंतर दिनेश खारा यांच्या नियुक्तीची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली. 

२०१७ मध्ये खारा एसबीआयच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते. मात्र त्यावेळी रजनीश कुमार यांची निवड झाली. आता तीन वर्षांनी एसबीआयचे नेतृत्व करण्याची संधी खारा यांना मिळाली आहे. बॅंक्स बोर्ड ब्युरोने दिनेश खारा यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारला केली होती. त्यावर केंद्र सरकारने शिक्कामोर्तब केले.  त्यांच्याक डे स्टेट बँकेचे व्यवस्थापकीय संचालक (जागतिक बँकिंग आणि साहाय्यक कंपन्या) असा पदभार होता.  खारा यांना पदोन्नती मिळाल्याने बँकेचे एक व्यवस्थापक संचालक पद आता रिक्त झाले आहे.  दिल्ली युनिव्हर्सिटीमधून खारा यांनी एमबीए केले आहे.

१९६१ मध्ये जन्मलेल्या खारा यांनी 'एसबीआय'मध्ये १९८४ मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून सुरुवात केली.  ते नोव्हेंबर २०१३ ते ऑगस्ट २०१६ या काळात एसबीआय म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होते.



हेही वाचा -

 प्रवाशांसाठी गुड न्यूज! ९ आॅक्टोबरपासून धावणार ‘या’ ५ विशेष एक्स्प्रेस

 मुंबईकरांनो सांभाळून रहा! येत्या २-३ दिवसांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता 



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा