Advertisement

घरगुती गॅस पुन्हा महागला, 'इतक्या' रुपयांची वाढ

देशासह राज्यात पेट्रोल-डिझेलच्या दराने शंभरी गाठल्याने आधीच सर्वसामान्यांना फटका बसला आहे. त्यानंतर आता घरगुती गॅसच्या किंमतीतही वाढ झाली आहे.

घरगुती गॅस पुन्हा महागला, 'इतक्या' रुपयांची वाढ
SHARES

घरगुती गॅस आता पुन्हा महागला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी सोमवारी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात २५ रुपये वाढ केली. आता विना सबसिडी १४.२ किलोच्या सिलिंडरचा दर ८१९ रुपये झाला आहे. आधी हा दर ७९४ रुपये होता. 

देशासह राज्यात पेट्रोल-डिझेलच्या दराने शंभरी गाठल्याने आधीच सर्वसामान्यांना फटका बसला आहे. त्यानंतर आता घरगुती गॅसच्या किंमतीतही वाढ झाली आहे. २०२१ मध्ये गॅस सिलिंडर आतापर्यंत १२५ रुपयांनी महाग झाला आहे. १ जानेवारीला ही किंमत ६९४ रुपये होती. आता ८१९ रुपये झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात घरगुती  सिलिंडरचे दर ३ वेळा वाढले आहे. ४ फेब्रुवारी रोजी दरात २५ रुपयांची वाढ केली होती. तर १५ फेब्रुवारीला ५० रुपये आणि २५ फेब्रुवारीला २५ रुपयांची वाढ करण्यात आली होती.

दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजीचे दर बदलतात. जानेवारी महिन्यात  गॅसच्या दरात वाढ झाली नव्हती. पण फेब्रुवारीमध्येच एलपीजी गॅसच्या किंमती जवळपास १०० रुपयांनी वाढल्या. तर डिसेंबर महिन्यात वाढलेले दर पकडून २०० रुपयांनी गॅस महाग झाला आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा