मुंबईकरांना दुबईत प्रॉपर्टी खरेदी करण्याची संधी

  Pali Hill
  मुंबईकरांना दुबईत प्रॉपर्टी खरेदी करण्याची संधी
  मुंबई  -  

  मुंबई - वांद्रे-कुर्ला संकुल येथे 9 डिसेंबर ते 11 डिसेंबर दरम्यान दुबई प्रॉपर्टी शो भरणार आहे. या प्रॉपर्टी शोअंतर्गत मुंबईकरांसह देशभरातील भारतीय नागरिकांना दुबईत मालमत्ता खरेदी करण्याची संधी एका छताखाली उपलब्ध होणार आहे. दुबई लॅण्ड डिपार्टमेन्ट आणि दुबईतील बिल्डरांनी एकत्रित दुबई प्रॉपर्टी शो भरवण्यास सुरुवात केली असून, दुसरा प्राॅपर्टी शो (मालमत्ता प्रदर्शन) या प्रॉपर्टी शोचे उद्घाटन 9 डिसेंबरला होणार असून, या वेळी अभिनेता अरबाज खान हजेरी लावणार आहे. गेल्या काही वर्षांत भारतीयांकडून दुबईमध्ये मालमत्ता खरेदी करण्यास मोठी पसंती दिली जात आहे. त्यामुळेच पहिल्या प्रॉपर्टी शोमध्ये 3 हजार 656 व्यवहार झाले होते आणि त्यातून 700 कोटी रुपयांची गुंतवणूक दुबई रिअल इस्टेट क्षेत्रात झाली होती. त्यामुळे दुसऱ्या प्रॉपर्टी शोलाही भारतीयांकडून चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास या शोमध्ये सहभागी होणारे बिल्डर कल्पेश संपत यांनी व्यक्त केला आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.