फे डिसुझा यांनी दिला मिरर नाऊचा राजीनामा

प्रसिद्ध अँकर आणि मिरर नाऊची कार्यकारी संपादिका फे डिसुझा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

SHARE

प्रसिद्ध अँकर आणि मिरर नाऊची कार्यकारी संपादिका फे डिसुझा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांच्या जागी विनय तिवारी यांची मिरर नाऊचे व्यवस्थापकीय संपादक म्हणून निवड करण्यात आल्याची माहिती आहे. 

सोबतच टाइम्स नाऊचे उपाध्यक्ष आणि इनपुट हेड हेक्टर केनथ यांची टाइम्स नाऊ आणि मिरर नाऊ यांचे इनपुट हेड म्हणून करण्यात आली आहे.  

२०१७ मध्ये मॅजिक ब्रिक्स नावाने ओळखलं जाणाऱ्या या चॅनलच नाव बदलून मिरर नाऊ असं करण्यात आलं होतं. तेव्हापासून फे डिसुझा यांची चॅनलचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. देशातील अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर प्रकाशझोत टाकून त्या सर्वसामान्यांचा आवाज बनल्या होत्या.  

फे डिसुझा यांना रेडइंकच्या ‘जर्नलिस्ट आॅफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. ‘द अर्बन डिबेट’ या शोच्या माध्यमातून त्या सडेतोड भूमिका मांडत असल्याने हा शो प्रेक्षकांमध्ये चांगलाच लोकप्रिय आहे. ते मिरर नाऊ सोडत असल्याच्या वृत्तामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये निराशा पसरली असून ते सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत.    

संबंधित विषय
ताज्या बातम्या

YouTube व्हिडिओ