सोन्याची मागणी घटली

  Pali Hill
  सोन्याची मागणी घटली
  मुंबई  -  

  मुंबई - नोटाबंदीच्या निर्णयानंतर सोन्याची मागणी घटलीय. त्यामुळे सोने २६ हजार रुपयांपर्यंत घसरेल आहे. नोटाबंदीनंतर सोन्याची केवळ 10 ते 20 टक्केच विक्री झाल्याचं सराफांनी सांगितलं. नोटाबंदीमुळे बाजारात पुरेशी रोकड उपलब्ध नाही. त्यामुळे सोन्याची मागणी ८० टक्क्यांनी घटलीय. परिणामी सोन्याची किंमत झपाट्यानं घसरतंय. सोन्याचे दर पुन्हा स्थिरस्थावर होण्यासाठी आणखी तीन ते चार महिने लागतील असा अंदाज सराफांनी व्यक्त केलाय.

  येणार्‍या काळात महागाई कमी राहील असे संकेत रिझर्व्ह बँकेनं दिलेत. त्याचाही परिणाम सोन्याच्या किमतीवर होणार असल्याचं सराफांनी म्हटलंय. दरम्यान, अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम सोन्याच्या जागतिक बाजारपेठेवर होऊन सोन्याची किंमत कमी होऊ शकते. याप्रकरणी येत्या १४ डिसेंबर रोजी अमेरिकन फेडरल रिझर्व्हची महत्त्वाची बैठक होणाराय. अशी माहिती मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष कुमार जैन यांनी दिली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.