Advertisement

काॅर्पोरेट करात कपात, केंद्र सरकारची महत्त्वाची घोषणा

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शुक्रवारी काॅर्पोरेट करात कपात करण्याची घोषणा केली. त्यामुळे देशातील कंपन्यांना आता २५.१७ टक्के कर द्यावा लागणार आहे. याआधी हा कर ३० टक्के होता.

काॅर्पोरेट करात कपात, केंद्र सरकारची महत्त्वाची घोषणा
SHARES

उद्योग क्षेत्राला उभारी देऊन मंदीसदृश्य परिस्थिती असलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी केंद्र सरकारने शुक्रवारी महत्वाची घोषणा केली. देशातील कंपन्या आणि नवीन मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांच्या काॅर्पोरेट कर (कंपनी कर) दरात कपात करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली. देशातील कंपन्या जर कोणतीही सवलत घेत नसल्यास त्यांना आता २२ टक्के कर द्यावा लागणार आहे. गोवामध्ये जीएसटी काऊंसिलच्या बैठकीअगोदर सीतारमन यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

कोणतीही सवलत न घेणाऱ्या भारतीय कंपन्यांना हा कर  २२ टक्के द्यावा लागेल. तर सरचार्ज आणि सेस आकारून कंपन्यांना २५.१७ टक्के काॅर्पोरेट कर द्यावा लागणार आहे. कराचे नवीन दर १ एप्रिल २०१९ पासून लागू केले जातील. नवीन दर हे दक्षिण-पूर्व आशियामध्ये सर्वात कमी असल्याचं सितारमन यांनी म्हटलं आहे. सद्या ४०० कोटींपर्यंत टर्नओव्हर असलेल्या कंपन्यांना २५ टक्के तर इतर कंपन्यांना ३० टक्के काॅर्पोरेट कर द्यावा लागत आहेत. १ आॅक्टोबर नंतर तयार होणाऱ्या नवीन मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांना १५ टक्के कर द्यावा लागेल. सरचार्ज आणि सेस आकारून हा दर १७.०१ टक्के असेल. 




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा