आता हवे तेवढे पैसे काढा


SHARE

मुंबई - चालू चलनातील जितकी रक्कम भराली असाल तितकीच रक्कम आता बॅँकेतून काढताही येणार आहे. चलनतुटवडा निर्माण होऊ नये म्हणून आठवड्यात फक्त 24 हजार रुपये काढण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र, आरबीआयनं अट आता शिथील केलीये. ज्यांच्याकडे पाचशे आणि दोन हजाराच्या नव्या नोटा आहेत, त्यांना आता दिलासा मिळणार आहे. सोमवारी 28 नोव्हेंबरला आरबीआयनं याबाबतचे आदेश दिले. मंगळवार 29 नोव्हेंबरपासून हा आदेश लागू करण्यात आलाय. सध्या बॅँकांमधून पैसे काढण्यास मर्यादा असल्यानं खातेदार बॅँकेत चालू चलनातील पैसे भरत नाहीत, अशी शक्यता असल्याचं रिझर्व्ह बॅँकेने म्हटलय. त्यावर हा उपाय करण्यात आलाय. त्यामुळे आता कंपनीकडून बँकेत जमा होणारा पगारही काढता येईल. त्यावर रकमेचं कसलंही बंधन राहणार नाही.

संबंधित विषय
ताज्या बातम्या