Advertisement

लॉकडाऊनमध्ये ग्राहकांच्या सोईसाठी ‘व्हॉईस बँकिंग सर्व्हिस’

या सुविधेअंतर्गत आयसीआयसीआयचे ग्राहक अगदी सोयीस्कररित्या बँकेची कामं करू शकतात.

लॉकडाऊनमध्ये ग्राहकांच्या सोईसाठी ‘व्हॉईस बँकिंग सर्व्हिस’
SHARES

लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांच्या सोईसाठी बँकिग क्षेत्रात वेगवेगळ्या उपाययोजना आखल्या जात आहेत. सध्या काही बँकांनी ATM व्हॅनची सोय केली आहे. तर काहींनी ऑनलाईन व्यवहारावर अधिक भर दिला आहे. आयसीआयसीआय बँकेनं देखील ग्राहकांना कोणत्याही समस्यांना सामोरे जायला लागू नये याकरता एक नवी सुविधा सुरू केली आहे. ICICI बँकेनं सुरी केलेली ही सुविधा नवीनच असून इतर कोणत्याही बँकेनं सुरू केली नाही. या सुविधेअंतर्गत आयसीआयसीआयचे ग्राहक अगदी सोयीस्कररित्या बँकेची कामं करू शकतात.

आयसीआयसीआयनं व्हॉईस असिस्टंट Amazon Alexa आणि Google Assistant यांच्याबरोबर AI संचालित मल्टी-चॅनल चॅटबॉट 'iPal' लाँच केला आहे. या चॅटबॉटच्या मदतीनं ग्राहकांची बँकिंगमधील कामं सोपी करण्याचा ICICI चा मानस आहे. लॉकडाऊनमुळे अनेक जणांना बँकेपर्यंत पोहोचणं कठीण झालं आहे. त्यामुळे ही योजना राबवण्यात येत आहे.

आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्वीट करत त्यांनी ही माहिती दिली आहे. ही सुविधा २४ तास उपलब्ध असणार असून याकरता बँकेचे अ‍ॅप वापरावे लागणार आहे.


अ‍ॅप कसं डाऊनलोड कराल?

  • डाऊनलोड Alexa / Google Assistant app
  • टु-फॅक्टर ऑथॅटिफिकेशनचा वापर करून सविंग अकाऊंट लिंक करावं लागले.
  • त्यानंतर Alexa / Google Home app ओपनं करावं लागेल.
  • Alexa मध्ये गेलात की, go to Skills & Games > Your skills > ICICI Bank iPal > settings > Link Account, असं लिंक करावं लागेल.
  • Google Home मध्ये गेल्यावर Explore in Google Assistant app >Search for action ICICI Bank iPal > Link, असं लिंक करता येईल.

ही सेवा कशी वापराल?

  • तुमच्या समस्या विचारू शकता
  • ग्राहकांना त्यांचे प्रश्न विचारण्यासाठी Alexa चा वापर करावा लागेल. उदाहरणार्थ "Alexa, मला माझ्या क्रेडिट कार्डमधील रक्कम सांग" किंवा "माझ्या खात्यात किती पैसे शिल्लक आहेत?"
  • यानंतर, ग्राहकांच्या ध्वनी आदेशास प्रतिसाद मिळालेल्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एसएमएस पाठवला जाईल.
  • ग्राहक उत्पादन आणि सेवा-संबंधित प्रशन देखील विचारू शकतात.

व्हॉट्सअ‍ॅप बँकिंग सर्व्हिस

ICICI नं गेल्या महिन्यात व्हॉट्सअ‍ॅप बँकिंग सर्व्हिस सुरू केली होती. ज्याअंतर्गत ग्राहकांना व्हॉट्सअ‍ॅपवरच सेव्हिंग अकाउंट बॅलेन्स (Savings Account Balance), शेवटचे तीन टान्झॅक्शन, क्रेडिट कार्ड लिमीट त्याचप्रमाणे प्री अप्रुव्ह्ड लोन इ. बाबींची माहिती मिळू शकते. तसंच व्हॉट्सअ‍ॅपवरच ग्राहक त्याचे क्रेडिट आणि डेबिट कार्ड देखील ब्लॉक किंवा अनब्लॉक करू शकतात.



हेही वाचा

कोटक महिंद्रा बँकेची ‘एटीएम ऑन व्हील्स’ सुविधा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा