Advertisement

३१ डिसेंबरच्या आत तुमचे ATM कार्ड बदलून घ्या, नाहीतर...

बँका ग्राहकांसाठी लवकरच ईएमव्ही चिप असलेले नवे एटीएम कार्ड अॅक्टीव्हेट करणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नं यासंदर्भात नियमावली जारी केल्यानं बँकांनी हे पाऊल उचललं आहे.

३१ डिसेंबरच्या आत तुमचे ATM कार्ड बदलून घ्या, नाहीतर...
SHARES

सर्व बँकांचे मॅग्नेटिक स्ट्रीप असलेले एटीएम कार्ड १ जानेवारीपासून बंद होणार आहे. ग्राहकांना चांगली सेवा प्रदान करण्यासाठी आणि पैशांच्या सुरक्षिततेसाठी बँकांनी हा निर्णय घेतला आहे. कार्डसंदर्भातील ही माहिती सर्व बँका आपल्या खातेधारकांना मेसेज पाठवून देत आहेत. या माहितीनुसार, सर्व ग्राहकांना लवकरच आपले एटीएम कार्ड बदलावे लागणार आहे. एटीएम  कार्ड बदलून न घेतल्यास ते ब्लॉक करण्यात येईल.

बँका ग्राहकांसाठी लवकरच ईएमव्ही चिप असलेले नवे एटीएम कार्ड अॅक्टीव्हेट करणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नं यासंदर्भात नियमावली जारी केल्यानं बँकांनी हे पाऊल उचललं आहे.


 ईएमव्ही कार्ड म्हणजे?

 ईएमव्ही हे स्मार्ट पेमेंट कार्ड आहे. यामध्ये मॅग्नेटिक स्ट्राईपच्या जागी इंटिग्रेटेड सर्किटमध्ये डेटा स्टोअर होतो. या कार्डला 'चिप कार्ड' आणि 'आयसी कार्ड' असं म्हटलं जातं. जेवढ्या वेळा तुम्ही या कार्डनं व्यवहार कराल तेवढ्या वेळा डायनामिक डेटा तयार होईल. या कार्डचे डुप्लिकेट कार्ड बनवता येणार नाही. शिवाय कार्डमधून कुठलीही माहिती कॉपी देखील होणार नाही.


डेटा चोरीपासून सुरक्षित

नव्या ईएमव्ही चिप कार्डच्या डेबिट आणि क्रेडीट कार्डमध्ये एक लहानशी चीप असेल. ज्यात तुमच्या अकाऊंटची पूर्ण माहिती असेल. ही माहिती इनक्रिप्टेड असेल. त्यामुळे यातील डेटा चोरीपासून सुरक्षित राहील. ईएमव्ही चिप कार्डद्वारे ट्राजेक्शन करताना एक युनिक ट्राजेक्शन कोड जनरेट होईल त्यानंतर कार्ड व्हेरिफाईड होईल. पूर्वीच्या एटीएम कार्डमध्ये या सुविधा उपलब्ध नव्हत्या.


एटीएम कार्ड बदलण्याच्या टिप्स

१) सर्वप्रथम बँकेच्या वेबसाईटच्या होमपेजवर जा.
२) तुमचे युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.
३) होमपेजवरील ई-सर्व्हीस वर क्लिक करा.
४) एटीएम कार्ड सर्व्हीस सिलेक्ट करा.
५ एटीएम कार्ड सर्व्हीसमध्ये एटीएम / डेबिट कार्डचा पर्याय निवडा.
६) त्यानंतर ज्या अकाऊंटसाठी तुम्हाला नवे एटीएम कार्ड हवे आहे ते अकाऊंट सिलेक्ट करा.
७) त्यानंतर कार्डवर अपेक्षित असलेले नाव भरा आणि एटीएम कार्डचा प्रकार सिलेक्ट करुन सबमिट करा.
८) तुम्ही बँकेच जाऊन देखील कार्ड बदलून घेऊ शकता. यासाठी बँकेतून एक फॉर्म घेऊन तो भरावा लागेल. फॉर्म दिल्यानंतर एक आठवड्यात तुम्हाला तुमचे नवीन कार्ड मिळेल.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा