Advertisement

केंद्र सरकारकडून ४३ मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी

देशाचे सार्वभौमत्व, अखंडता आणि सुरक्षेसाठी धोका असल्याचं कारण देत या अ‍ॅपवर बंदी घालण्यात आल्याचं कारण सरकारकडून देण्यात आलं आहे.

केंद्र सरकारकडून ४३ मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी
SHARES

केंद्र सरकारने मंगळवारी आणखी ४३ मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी घातली. देशाचे सार्वभौमत्व, अखंडता आणि सुरक्षेसाठी धोका असल्याचं कारण देत या अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आल्याचं कारण सरकारकडून देण्यात आलं आहे.

माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६९ अ अंतर्गत या अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. या ४३ अॅप्समध्ये १४ डेटिंग, ८ गेमिंग, ६ बिझनेस/ फायनान्स आणि एका एंटरटेनमेंट अ‍ॅप्सचा समावेश आहे. केंद्र सरकारने मागील १४८ दिवसांत २६७ अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे.

सरकारने आतापर्यंत चारवेळा अ‍ॅप्सवर कारवाई केली आहे. पहिल्यांदा २९ जूनला ५९ चीनी अ‍ॅप्स बॅन करण्यात आले होते. गलवानमध्ये झालेल्या हिंसक हाणामारीनंतर ही कारवाई करण्यात आली होती. यानंतर २७ जुलैला ४७ अ‍ॅप्स बंद करण्यात आले. लडाखमध्ये तणाव वाढल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. यानंतर २ सप्टेंबरला सरकारने पबजीसह ११८ अ‍ॅप्स बॅन केले. त्यानंतर आता पुन्हा सरकारने अ‍ॅप्सवर कारवाई केली आहे.


बंदी घालण्यात आलेले अ‍ॅप्स

१. अली सप्लायर्स

२. अली बाबा वर्कबेंच

३. अली एक्सप्रेस- स्मार्टर शॉपिंग, बेटर लिविंग

४. अलीपे कॅशियर

५. लालामोव इंडिया- डिलीवरी अॅप

६. ड्राइव विद लालामोव इंडिया

७. स्नॅक व्हिडिओ

८. कॅमकार्ड- बिजनेस कार्ड रीडर

९. कॅम कार्ड- BCR (वेस्टर्न)

१०. सोल- फॉलो द सोल टु फाइंड यू

११. चायनीज सोशल- फ्री ऑनलाइन डेटिंग वीडियो अॅप अँड चॅट

१२. डेट इन एशिया- डेटिंग अॅड चैट फॉर एशियन सिंगल्स

१३. वी डेट- डेटिंग अॅप

१४. फ्री डेटिंग अॅप- सिंगल, स्टार्ट योर डेट

१५. एडोर अॅप

१६. ट्रूली चायनीज- डेटिंग अॅप

१७. ट्रूली एशियन- डेटिंग अॅप

१८. चायना लव- डेटिंग अॅप फॉर चायनीज सिंगल्स

१९. डेट माई एज- चॅट, मीट, डेट

२०. एशियन डेट

२१. फ्लर्ट विश

२२. गाइज ओनली

२३. ट्यूबिट

२४. वी वर्क चायना

२५. फर्स्ट लव लाइव - सुपर हॉट लाइव ब्यूटीज लाइव ऑनलाइन

२६. रेला - लेस्बियन सोशल नेटवर्क

२७. कॅशियर वॉलेट

२८. मँगो टीवी

२९. एमजी टीवी - ह्यूमन टीवी ऑफिशियल टीवी अॅप

३०. वी टीवी - टीवी व्हर्जन

३१. वी टीवी - सी ड्रामा के ड्रामा अँड मोर

३२. वी टीवी लाइट

३३. लकी लाइव- लाइव व्हिडिओ स्ट्रीमिंग अॅप

३४. टाओवाओ लाइव्ह

३५. डिंग टॉक

३६. आइडेंटिटी वी

३७. आयसोलँड 2 : ऐशेज ऑफ टाइम

३८. बॉक्सस्टार (अर्ली एक्सेस)

३९. हीरोज इवोल्वड

४०. हॅप्पी फिश

४१. जेलिपॉप मॅच : डेकोरेट यूअर ड्रीम आइसलँड

४२. मंचकिन मॅच : मॅजिक होम बिल्डिंग

४३. कॉनक्विस्ताहेही वाचा -

शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीचे छापे

महाराष्ट्र : २०२० मध्ये बिबट्यांच्या मृत्यूच्या प्रमाणात वाढ, ५ वर्षांतील सर्वाधिक मृत्यूची नोंद

यंदा भाडेवाढ न करण्याचा बेस्टचा निर्णय


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा