महाराष्ट्रीय उद्योजकांची जागतिक परिषद

 Mumbai
महाराष्ट्रीय उद्योजकांची जागतिक परिषद

सीएसटी - सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टनं 14 जानेवारीला 'उद्योगबोध' या जागतिक परिषदेचं आयोजन केलंय. अंधेरीतल्या हॉटेल ललीतमध्ये परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. या उद्योजक परिषदेला जगभरातून येणाऱ्या उदयोजकांसोबत व्यवसायाची देवाण-घेवाण करण्याची संधी मिळणाराय, अशी माहिती ट्रस्टचे ब्रॅंड अंबेसिडर उदयोजक आणि अभिनेते संदीप कुलकर्णी यांनी दिली. मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उदयोग समूहांचे प्रतिनिधी परिषदेला येणारायेत. महिलांसाठी विशेष संधी उपलब्ध करून देण्यात येणाराय. या परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर राहणार असल्याचं कुलकर्णी यांनी म्हटलं.

Loading Comments