Advertisement

इन्फोसिसचे शेअर्स २ वर्षांच्या तळाला, शेअरहोल्डर असाल, तर ही घ्या काळजी…


इन्फोसिसचे शेअर्स २ वर्षांच्या तळाला, शेअरहोल्डर असाल, तर ही घ्या काळजी…
SHARES

सलग दुसऱ्या दिवशी इन्फोसिसच्या शेअर्समध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आलीय. यावरून कंपनीचे माजी एमडी आणि सीईओ विशाल सिक्का यांच्या राजीनाम्याच्या धक्क्यातून अजूनही इन्फोसिस सावरल्याचे दिसत नाहीय. तुम्ही इन्फोसिसचे शेअर होल्डर असाल तर सांभाळून कारण बहुतांश ब्रोकरेज हाऊसने या कंपनीच्या शेअर्सला ‘डाऊनग्रेड’ केलंय. त्यामुळं शक्य असंल तर कंपनीच्या ‘बायबॅक ऑफर’चा फायदा घ्यावा असं तज्ज्ञ गुंतवणूकदारांना सांगत आहेत.

सोमवारी दिवसभरात इन्फोसिसचे शेअर्स ५.८० टक्क्यांनी घसरून ८७५.२० वर पोहोचले. मागच्या दोन वर्षांतील इन्फोसिसच्या शेअर्सची ही नीच्चांकी पातळी आहे. शुक्रवारी सिक्का यांच्या राजीनाम्यानंतर कंपनीचे शेअर्स ९.५७ टक्क्यांच्या घसरणीसह ९२३ वर आले होते. त्यात सोमवारी पुन्हा भर पडली. दोन दिवसांत मिळून इन्फोसिसचे शेअर्स १५ टक्क्यांनी घसरले आहेत. यामुळं गुंतवणूकदारांचं किमान ३४ हजार कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं म्हटलं जात आहे.



काय आहे ‘बायबॅक ऑफर’?

‘बायबॅक ऑफर’ अंतर्गत कंपनी इन्फोसिसच्या ३६ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच शेअरहोल्डर्सकडून शेअर्सची खरेदी करणार आहे. त्यातून १३ हजार कोटी रुपये जमा करण्याची इन्फोसिसची योजना आहे. या ‘बायबॅक ऑफर’ची माहिती कंपनीनं मुंबई शेअर बाजाराला दिली आहे. कंपनीच्या संचालक मंडळानं ५ रूपये फेस व्हॅल्यू दरानं या शेअर्सच्या ‘बायबॅक ऑफर’ला मंजुरी दिली आहे. कंपनी प्रति शेअर ११५० रुपये या दरानं शेअर्सची खरेदी करणार आहे. यानुसार ११,३०,४३,४७८ शेअर्स कंपनी खरेदी करेल. शेअर्सची ही संख्या कंपनीच्या एकूण शेअर्सच्या ४.९२ टक्के आहे.


काय घ्यावी काळजी?

  • गुंतवणूक सल्लागार मनोज भोसले यांच्या मते, इन्फोसिसने जाहीर केलेली ‘बायबॅक ऑफर’ नक्कीच चांगली आहे. त्यामुळे शक्य असेल, तर तिचा फायदा घ्या.
  • सिक्का यांनी राजीनामा देण्याअगोदर इन्सोसिसच्या शेअर्सचे मूल्य १०२० रुपयांपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे ११५० रुपयांची ही ऑफर नक्कीच चांगली आहे.
  • सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीने ‘बायबॅक ऑफर’साठी कुठली 'ऑर्डर डेट' दिली आहे, हे तपासून घ्या. 
  • उदा. ऑर्डर डेट ३१ मार्च असेल, तर केवळ ३१ मार्चपर्यंत खरेदी केलेले शेअर्सच कंपनीकडून स्वीकारले जातील.
  • कंपनीच्या शेअर्सची आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन शेअर खरेदी करण्यासाठी थोडी वाट पाहावी.



हे देखील वाचा -

‘सिक्कां’च्या राजीनाम्याने गुंतवणूकदारांना ३१ हजार कोटींचा फटका



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा