तयार रहा! जियो फोनचे बुकींग सुरू...


SHARE

जियो फोन विकत घेण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या ग्राहकांनी तय्यार रहा... २४ ऑगस्टच्या सायंकाळी ५ वाजेपासून जियो फोनच्या नोंदणीला सुरूवात झाली आहे. फक्त ५०० रुपये शुल्क भरून ग्राहकांना या फोनचे बुकींग करता येईल. तर डिलिव्हरी घेताना आणखी १ हजार रुपये द्यावे लागतील. म्हणजेच एकूण दीड हजारात हा फोन तुमच्या हाती येईल. रिलायन्स जियोने सादर केलेल्या प्रसिद्धी पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ४० व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकी 'एजीएम'मध्ये २१ जुलै रोजी 'जियो फोन'चे अनावरण करण्यात आले होते. भारतीय बाजारातील हा आजपर्यंतचा सर्वात स्मार्टफोन असेल. पुढच्या वर्षभरात देशभरातील ९९ टक्के मोबाईल बाजारपेठ काबिज करण्याचा दावा, कंपनीने केला आहे. दर आठवड्याला ५० लाख यानुसार ५० कोटी जियो फोन विकण्याचे लक्ष्य कंपनीने समोर ठेवले आहे. 


असे करा बुकींग

 • फोनसाठी बुकींग सायंकाळी ५ वाजेपासून सुरू
 • जियोची वेबसाईट, माय जियो अॅप आणि रिलायन्स डिजिटल स्टोअरमध्ये ५०० रुपये शुल्क भरून फोनची नोंदणी करा
 • फोनची डिलिव्हरी घेताना आणखी १ हजार रुपये शुल्क ग्राहकाला भरावे लागतील
 • म्हणजेच एकूण १,५०० रुपयांच्या 'सिक्युरिटी मनी' अंतर्गत ग्राहकाला हा फोन मिळेल
 • 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वानुसार या फोनची विक्री
 • सप्टेंबरपासून फोनची डिलिव्हरी सुरू होण्याची शक्यता


प्रतिस्पर्धी कंपन्याही तयारीत

जियोच्या मार्केटींगने हैराण झालेल्या प्रतिस्पर्धी मोबाईल कंपन्याही जियो फोनप्रमाणे फोन बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. व्होडाफोन आणि आयडिया कंपन्या नवीन ऑफर अंतर्गत फोन आणण्याची शक्यता आहे.


जियो फोनमधील फिचर्स

 • 'जियो धन धना धन' ऑफर अंतर्गत महिन्याला १५३ रुपये भरून अनलिमिटेड डेटा प्लान
 • ५३ रुपये साप्ताहिक, २४ रुपयांचा २ दिवसांचा डेटा प्लान
 • व्हॉईस कमांडद्वारे एसएमएस, इंटरनेट सुविधा
 • फोनमध्ये एकूण २२ भाषांचा समावेश
 • व्हॉईस कॉल, एसएमएस पूर्णपणे मोफत
 • जियो अॅपचा समावेश
 • केबल टीव्ही ३०९ रुपये प्रति महिना
 • फोन टीव्ही केबललाही जोडता येईल
 • पेमेंट सर्विसची सुविधा
 • अल्फा न्युमरिक कीपॅड, २.४ इंची क्यूव्हीजीए डिस्प्ले 
 • एफएम रेडिओ, टॉर्च लाइट, हेडफोन जॅक, एसडी कार्ड 
 • फोर वे नेव्हिगेशन सिस्टीम, फोन कॉन्टॅक्ट, कॉल हिस्ट्रीहे देखील वाचा -

200 च्या नोटेला एटीएमबंदी?डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
ताज्या बातम्या