Advertisement

एटीएममधून जास्तीत जास्त ५ हजार रुपये काढण्याची शिफारस

एटीएममधून आगामी काळात पैसे काढणे महाग पडू शकतं.

एटीएममधून जास्तीत जास्त ५ हजार रुपये काढण्याची शिफारस
SHARES

एटीएममधून आगामी काळात पैसे काढणे महाग पडू शकतं. तसंच एटीएममधून ५ हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढण्यास मर्यादा घातली जाऊ शकते. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या एका समितीने ही शिफारस केली आहे. रिझर्व्ह बँकेने अद्याप या शिफारशींवर कोणताही निर्णय घेतलेला नाही.

एटीएम इंटरचेंज फी-स्ट्रक्चरच्या आढाव्यासाठी इंडियन बँकर्स असोसिएशन(आयबीए)चे मुख्य कार्यकारी यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या वर्षी स्थापन समितीने एटीएममधून रोकड काढण्यावर ५ हजार रुपयांपर्यंत मर्यादा ठेवण्याची शिफारस केली आहे. तसंच जास्त पैसे काढण्यासाठी १६ ते २४ टक्के शुल्क आकारण्याची आणि फ्री-ट्रान्झक्शनपेक्षा जास्त वेळा पैसे काढण्यास परवानगी न देण्याची शिफारस केली आहे. एटीएम संचालनाचा खर्च वाढल्याचे समितीने या शिफारशी केल्या आहेत. २००८ पासून एटीएम वापर शुल्कात कोणताही बदल झाला नाही. सध्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून ग्राहक एका व्यवहारात १० हजार रुपये आणि एका दिवसात २० हजार रुपये काढू शकतो. अन्य बँकांमध्ये सिंगल ट्रान्झॅक्शन आणि रोज पैसे काढण्याची मर्यादा वेगवेगळी आहे. आयसीआयसीआय बँकेत ही मर्यादा ५० हजार ते १.५० लाख रुपयांदरम्यान आहे.

किती महाग होऊ शकते एटीएम?

१० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येची शहरे  

- ट्रान्झॅक्शन मर्यादेपेक्षा जास्त वेळेस पैसे काढल्यास शुल्क १५ रु. वरून वाढून १७ रुपये.

- बॅलन्स तपासणी, पिन बदलाचे शुल्क ५ रुपयांवरून ७ रुपये.

१० लाखांपेक्षा कमी लोकसंख्येची शहरे

- फ्री-ट्रान्झॅक्शनची संख्या ५ वरून वाढून ६ होऊ शकते. 

-सहापेक्षा जास्त वेळा पैसे काढण्यासाठी शुल्क १५ वरून वाढून १८ रुपये होऊ शकते. 3. बॅलन्स तपासणी, पिन बदलाचेत शुल्क ५ वरून वाढून ७ रुपये.



हेही वाचा -

G South पालिकेच्या कार्यालयात 'अशी' घेतली जातेय कर्मचाऱ्यांची काळजी

३० मिनिटात कोरोनाचं निदान, पालिकेचं 'मिशन युनिव्हर्सल टेस्टिंग'




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा