Advertisement

दाम करी काम


दाम करी काम
SHARES

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री चलनातून पाचशे आणि हजाराच्या नोटा बाद करण्याची घोषणा केल्यामुळे देशवासीयांची झोपच उडाली. आपल्याकडील नोटांचे करायचे काय या विचारानं काहींनी जागर केली. अखेर गुरुवारचा दिवस उजाडला आणि लोकांनी पैसे काढण्यासाठी बँकापुढे सकाळपासून रांगा लावल्या. एटीएममुळे बँकेत जाण्याचा प्रसंग हल्ली क्वचितच लोकांवर येत होता. मात्र गुरुवारी शहरातील सारेच रस्ते बँकेच्या दिशेनं वाहात होते. काहींनी रांगा लावून पैसे भरले आणि काहींनी काढलेही. तर नव्या दोन हजारांच्या नोटा पाहून उत्साहात सेल्फीही काढली. मात्र काहींना फक्त चार हजार रुपयेच काढता आले. काही बँकांना पोलीस बंदोबस्तात काम करावं लागलं. तर पोलिसांनी पैसे सांभाळून घरी न्या, अशा सूचनाही नागरिकांना दिल्या.
एकूणच दाम करी काम आणि नव्या नोटेला सलाम असं चित्र गुरुवारी सर्वत्र पाहाण्यास मिळालं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा