Advertisement

मूडीजने 13 वर्षानंतर भारताची पत सुधारली


मूडीजने 13 वर्षानंतर भारताची पत सुधारली
SHARES

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदी आणि त्यानंतर जीएसटी या निर्णयामुळे सर्व स्तरातून टीकेची झोड उठली होती. पण मोदी सरकाचे हेच निर्णय आज भारतासाठी फायदेशीर ठरले आहेत. कारण जागतिक पत मानांकन संस्था मूडीजने सरकारने भारतात लागू केलेल्या जीएसटी, नोटाबंदी, आधार लिंकिंगचे कौतुक केले आहे. इतकेच नाही तर भारताच्या क्रेडिट रेटिंगमध्येही तब्बल 13 वर्षांनी सुधारणा केली आहे.


सेन्सेक्सने घेतली झेप

भारताची जागतिक क्रेडिट रेटिंगमध्ये सुधारणा झाल्यानंतर शुक्रवारी सकाळी सेन्सेक्स 381 अंकाने झेप घेत 33,520 अंकांवर पोहोचला. तर निफ्टीनेही 109 अंकांनी उसळी घेतली. हे रेटिंग वाढल्यामुळे भारतीय कंपन्यांना जागतिक बाजारातून स्वस्त दराने कर्ज मिळण्यासही मदत होणार आहे. 2004 नंतर 13 वर्षांनी मूडीजने भारताच्या लोकल आणि फॉरेन करन्सी एश्युअर रेटिंगमध्ये बीएए3 वरून बीएए2 असा बदल केला आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा