टाटातून गच्छंतीमुळे मिस्त्री नाराज

 Pali Hill
टाटातून गच्छंतीमुळे मिस्त्री नाराज

मुंबई - सायरस मिस्त्री यांना चेअरमन ऑफ टाटा ग्रुप या पदावरून हटवण्यात आलंय. याबद्दल नाराजी व्यक्त करणारं एक इ-मेल त्यांनी त्यांनी टाटा ग्रुपच्या अन्य संचालकांना पाठवलंय. आपल्याला याबाबत कसलीच माहिती नव्हती, तसंच बाजू मांडण्यासाठी संधीही मिळाली नाही, असंही त्यांनी म्हटलंय. सोमवारी सायरस मिस्त्री यांना टाटा ग्रुपच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आलं होतं. त्यानंतर बुधवारी त्यांनी हा इ-मेल केला आहे. या समूहाच्या संचालक मंडळात 9 जण आहेत. त्यातल्या 6 जणांनी मिस्त्रींविरोधात मतदान केलं तर दोघं अनुपस्थित राहिले.

Loading Comments