Advertisement

'या' ८ बँकांच्या ग्राहकांनी लक्ष द्या, १ एप्रिलपासून नाही चालणार जुनं चेकबुक, तात्काळ करा बँकेशी संपर्क

विलीनीकरणामुळे या बँकांचा आयएफएससी १ एप्रिलपासून कोड बदलणार आहे. तसंच जुनं चेकबुकही आता चालणार नाही.

'या' ८ बँकांच्या ग्राहकांनी लक्ष द्या, १ एप्रिलपासून नाही चालणार जुनं चेकबुक, तात्काळ करा बँकेशी संपर्क
SHARES

मागील वर्षी आंध्र बँक, कॉर्पोरेशन बँक, देना बँक, विजया बँक, सिंडिकेट बँक, अलाहाबाद बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनाइटेड बँक ऑफ इंडिया या बँकांचं इतर बँकांमध्ये विलीनीकरण झालं आहे. विलीनीकरणामुळे या बँकांचा आयएफएससी १ एप्रिलपासून कोड बदलणार आहे. तसंच जुनं चेकबुकही आता चालणार नाही. या बँकेच्या ग्राहकांना १ एप्रिलच्या आधी नवीन चेकबुक घ्यावं लागणार आहे. १ एप्रिलपासून जुनं चेकबुक चालणार नाही. 

आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँकेचं विलीनीकरण युनियन बँकेमध्ये झालं आहे.१ एप्रिलपासून आंध्र बँकेचा आयएफएससी कोड UBIN08 आणि कॉर्पोरेशन बँकेचा आयएफएससी कोड UBIN09 असणार आहे. बँकेच्या ग्राहकांना ३१ मार्चपर्यंत नवीन आयएफएससी कोड घ्यावा लागणार आहे. 

आपण बँकेच्या वेबसाइटद्वारेही नवीन आयएफएससी कोड जाणू शकता. यासाठी तुम्हाला बँकेच्या www.unionbankofindia.co.in वेबसाइटवर जावं लागेल. येथे  amaigamation Centre वर क्लिक करा. त्यानंतर आपल्याला नवीन  आयएफएससी कोड जाणून घेता येईल. याशिवाय आपण कस्टमर केअर क्रमांक १८००२०८२२४४  किंवा १८००४२५१५१५ किंवा १८००४२५३५५५ वर फोन करू शकता. 

तसंच मेसेज करूनही आयएफएससी कोड समजू शकतो. यासाठी आयएफएससी असं लिहून  ९२२३००८४८६ या क्रमांकावर मेसेज करावा लागेल.  आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँकेच्या ग्राहकांना नवीन चेकबुक घ्यावं लागणार आहे. हे चेकबुक युनियन बँकेचं असेल आणि यावर आयएफसी कोड पण अपडेट केलेला असेल. 

पंजाब नॅशनल बँकेनेही (पीएनबी) आपल्या ग्राहकांना आयएफएससी आणि एमआयसीआर कोड १ एप्रिलच्या आधी बदलून घेण्यास सांगितलं आहे. ३१ मार्च २०२१ नंतर हे दोन्ही कोड काम करणार नाहीत. जर तुम्हाला पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर नवीन कोड बँकेकडून घ्यावा लागेल, असं पीएनबीने म्हटलं आहे.

ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनाइटेड बँक ऑफ इंडियाचे जुने चेकबुक आणि आयएफएससी / एमआयसीआर कोड ३१ मार्चपर्यंत सुरू आहेत. त्यानंतर बँकेचा नवीन कोड आणि चेकबुक घेणं आवश्यक असल्याचं पीएनबीने सांगितलं आहे.  ग्राहक अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक १८००१८०२२२२ / १८००१०३२२२२ वर काॅल देखील करू शकतात.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा