Advertisement

नवीन एलपीजी गॅस कनेक्शन महागणार! मोजावे लागतील 'इतके' पैसे

नवीन एलपीजी गॅस कनेक्शन घेणे महागले आहे.

नवीन एलपीजी गॅस कनेक्शन महागणार! मोजावे लागतील 'इतके' पैसे
SHARES

नवीन एलपीजी गॅस कनेक्शन घेणे महागले आहे. सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी गुरुवारी 16 जून पासून घरगुती गॅस कनेक्शनच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

५ किलोंच्या गॅस सिलेंडरच्या कनेक्शनसाठीदेखील 350 रुपये अधिक मोजावे लागणार आहे. त्याशिवाय, पेट्रोलियम कंपन्यांनी गॅस रेग्युलेटरच्या दरात वाढ केली आहे. नव्या गॅस रेग्युलेटरसाठी 100 रुपये अधिक द्यावे लागणार आहेत.

दरवाढीच्या नव्या निर्णयानंतर गॅस कनेक्शन घेण्यासाठी तुम्हाला 2200 रुपये मोजावे लागणार आहे. याआधी 1450 रुपये द्यावे लागत होते. याचाच अर्थ 750 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्याशिवाय गॅस रेग्युलेटरसाठी 250 रुपये, पासबुकसाठी 25 आणि पाइपसाठी 150 रुपये अतिरिक्त द्यावे लागणार आहेत.

नवीन एलपीजी गॅस जोडणी घेणाऱ्या ग्राहकाला आता 3690 रुपये द्यावे लागत होते. त्याशिवाय दोन सिलेंडर घेणाऱ्या ग्राहकाला 4400 रुपये द्यावे लागणार आहे.

५ किलोच्या गॅस सिलेंडर सुरक्षा ठेवीसाठी आता अधिक रक्कम द्यावी लागणार आहे. पाच किलोंच्या सिलेंडरसाठी आता 800 रुपयांऐवजी 1150 रुपये द्यावे लागणार आहेत.

पंतप्रधान उज्जवला योजनेतंर्गत स्वयंपाक गॅस सिलेंडर घेणाऱ्या ग्राहकांना याचा फटका बसणार आहे. या ग्राहकांना आपल्या जोडणीवर दुसरा सिलेंडर हवा असल्यास त्यांना वाढलेली सुरक्षा रक्कम द्यावी लागणार आहे. ग्राहकांना नवीन जोडणीत लावण्यात येणाऱ्या रेग्युलेटरसाठी 150 रुपयांऐवजी 250 रुपये मोजावे लागणार आहे.हेही वाचा

घरपोच इंधन देणार मोबाइल सीएनजी स्टेशन

मुंबईत ब्रेडच्या किंमतीत दुसऱ्यांदा वाढ, 'हे' आहेत नवे दर

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा