Advertisement

मुंबईत ब्रेडच्या किंमतीत दुसऱ्यांदा वाढ, 'हे' आहेत नवे दर

ब्रेडच्या किमतीत पाच महिन्यांमध्ये दुसर्‍यांदा वाढ झाली आहे.

मुंबईत ब्रेडच्या किंमतीत दुसऱ्यांदा वाढ, 'हे' आहेत नवे दर
SHARES

स्लाइस ब्रेडच्या किंमतीत 2 ते 5 रुपयांची वाढ झाली आहे. नव्या दरवाढीनुसार, 350 ते 400 ग्रॅम पांढर्‍या ब्रेडची किंमत 33 रुपयांवरून 35 रुपये झाली आहे.

ब्राऊन ब्रेडची किंमत 45 रुपयांवरून 50 रुपये झाली आहे. सँडविचसाठी वापरल्या जाणार्‍या ब्रेडची किंमत 65 वरून 70 रुपयांवर पोहोचली आहे. ब्रेडच्या किमतीत पाच महिन्यांमध्ये दुसर्‍यांदा वाढ झाली आहे.

ब्रेड बनवण्यासाठीचे घटक महागल्याने ब्रेडच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आल्याचे इंडियन बेकर्स फेडरेशनचे सदस्य राज कुमार यांनी सांगितले. ब्रेड बनवण्यासाठी दोन प्रमुख घटक असलेल्या गहू आणि खाण्याच्या तेलाच्या किमतीमध्ये गेल्या चार महिन्यांमध्ये कमालीची वाढ झाली आहे.

ने-आण करण्याचे रेटही (ट्रान्सपोर्टेशन आणि कामगारांचा खर्च) वाढला आहे. या सर्वांमुळे ब्रेडच्या किमतीमध्ये वाढ करण्याशिवाय पर्याय नसल्याचे कुमार यांचे म्हणणे आहे. ब्रेडच्या किमती वाढल्याने सँडविच तसेच ब्रेडपासून बनवल्या जाणार्‍या तत्सम पदार्थांचे दरही वाढले आहेत.

केंद्र सरकारने मे महिन्यात गव्हाची खुल्या बाजारात विक्री करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर एक हजार किलो गव्हाची किंमत 25 हजार रुपयांच्या घरात गेली आहे. गव्हाच्या वाढत्या किमतीनंतर ब्रेडच्या किमतीमध्ये वाढ करण्याचे संकेत ब्रेड उत्पादक कंपन्यांनी दिले होते. त्याला अनुसरून मॉडर्न, ब्रिटानिया आणि विब्ज या प्रमुख तीन ब्रेड उत्पादक कंपन्यांनी गेल्या आठवड्यापासून दरवाढ केली आहे.

एक हजार किलो गव्हाची किंमत 25 हजार रुपयांच्या घरात गेली आहे. दुसर्‍यांदा वाढ झाल्यान 350 ते 400 ग्रॅम वजनाच्या ब्रेडसाठी आता 2 रुपये अधिक मोजावे लागत आहेत.

ब्राउन ब्रेडची किंमत पाच, मल्टीग्रेन ब्रेडची किंमत दहा तसेच सँडविचसाठीच्या ब्रेडची किंमत प्रत्येकी पाच रूपयांनी वाढली आहे. यापूर्वी, जानेवारीमध्ये ब्रेडच्या दरांमध्ये 3 ते 5 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यामुळे मागील पाच महिन्यांत ब्रेड हा 5 ते 10 रुपयांनी महागला आहे.



हेही वाचा

मोबाइल कंपन्या प्रीपेड प्लॅनच्या किमती वाढवणार

घरगुती एलपीजी सिलेंडर 200 रुपयांनी स्वस्त, 'या' योजना धारकांना होणार फायदा

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा