निविदा काढूनही सीआर टू-आयनॉक्स उपाशीच

 Mumbai
निविदा काढूनही सीआर टू-आयनॉक्स उपाशीच

मुंबई - एमएमआरडीएकडून बांधण्यात आलेल्या दक्षिण मुंबईतल्या सीआर टू (आयनाँक्स) इमारतीतील फूडकोर्ट दोन वर्षांपासून बंद. त्यामुळे सीआर टू मॉल, आयनॉक्स थिएटरमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. हे फूडकोर्ट सुरू करण्यासाठी एमएमआरडीएने याआधी तीनदा निविदा काढल्या पण त्याला काही प्रतिसाद मिळाला नाही. आता सीआर टू मधील व्यापारी-दुकानदारांनी व्यवसायावर परिणाम होत असल्याचं म्हणत फूडकोर्ट सुरू करण्याची मागणी उचलून धरली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा एमएमआरडीएनं फूडकोर्ट चालवण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. फूडकोर्टचं भाडे परवडणारं नसल्याचं म्हणत याआधीच्या कंत्राटदारानं कंत्राट अर्धवट सोडून पळ काढला होता. तर भाडं परवडत नसल्याचंच म्हणत कंपन्यांकडून निविदेला ठेंगा दाखवला जातोय. आता मात्र निविदेमध्ये बदल करण्यात आल्यानं या वेळी निविदेला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास एमएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी अनिल वानखेडे यांनी व्यक्त केलाय.

Loading Comments