Advertisement

'पेटीएम'ची पेमेंट बँक लाॅन्च!


'पेटीएम'ची पेमेंट बँक लाॅन्च!
SHARES

मोबाईल वाॅलेट कंपनी 'पेटीएम'च्या पेमेंट्स बँकेचं उद्घाटन मंगळवारी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते करण्यात आलं. या माध्यमातून कंपनी डिजिटल पेमेंट सर्व्हिससोबत फायनांन्शिअल सर्व्हिस आणि ई-काॅमर्स क्षेत्रात विस्तार करत आहे. या विस्तारासाठी येत्या काळात 'पेटीएम' २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची माहितीही कंपनीने यावेळी दिली.


कुठल्या सेवा मिळतील?

पेटीएम पेमेंट्स बँकेत जलद आणि कागद विरहित खाते उघडता येईल, बचत खात्यावर व्याज, ऑनलाईन व्यवहारांवर शून्य शुल्क आकारणी, किमान शिल्लक रकमेची अनावश्यकता, विनामूल्य वैयक्तिकृत 'रूपे' डिजिटल डेबिट कार्ड, कोणत्याही एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा मिळेल.भारत आर्थिक क्रांतीच्या शिखरावर आहे. वित्तीय सेवांच्या वापरामुळे देशात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील आणि 'पेटीएम'ला या आर्थिक सेवाक्रांतीचा एक भाग होण्याची जी संधी मिळाली त्याचा आम्हाला अभिमान आहे. 'पेटीएम पेमेंट्स बँक' मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या दिशेने काम करेल. त्यानुसार 'पेटीएम' पुढच्या ३ वर्षांत किमान १८ हजार ते २० हजार कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करेल.

- विजय शेखर शर्मा, संस्थापक, 'पेटीएम'  


एवढे आहेत यूझर्स

नोटाबंदीनंतर 'पेटीएम'च्या व्यवसायात कमालिची वाढ झाली. 'पेटीएम' कंपनी मोबाईल वाॅलेट, रिचार्ज, बिल पेमेंट सर्व्हिस, ई-काॅमर्स (पेटीएम माॅल) आणि तिकीट सर्व्हिस देते. सद्यस्थितीत 'पेटीएम'चे २८ कोटी नोंदणीकृत यूझर्स आहेत. त्यापैकी १ कोटी ८० लाख यूझर्स 'पेटीएम'च्या वाॅलेट सर्व्हिसचा सक्रीय वापर करणारे आहेत.१ लाख कोटी रुपयांपर्यंत मजल

'पेटीएम'च्या प्लॅटफाॅर्मवर वर्षाला २५० कोटी व्यवहारांच्या आधारे ८० हजार कोटी रुपयांची उलाढाल होते. या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत हा आकडा १ लाख कोटी रुपयांपर्यंत जाईल, अशी अपेक्षा यावेळी शर्मा यांनी दिली.

तर, 'पेटीएम पेमेंट्स बँके'च्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेणू सत्ती म्हणाल्या की, 'पेटीएम पेमेंट्स बँक देशातील सर्वात मोठी मोबाईल-टेक्नॉलॉजीतील अग्रेसर बँक आहे. देशातील कानाकोपऱ्यात पोहोचून सेवांचा अभाव असलेल्या लोकसंख्येला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम करू.'

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा