Advertisement

शुक्रवारी रात्री 12 नंतर पेट्रोलपंप बंद


शुक्रवारी रात्री 12 नंतर पेट्रोलपंप बंद
SHARES

मुंबई - शुक्रवारी 11 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून शनिवार पहाटे पाच वाजेपर्यंत सर्व पेट्रोलपंप बंद राहणार आहेत. मुंबई पेट्रोल डिझेल असोसिएशनने हा निर्णय जाहीर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना 500 आणि1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयानंतर पेट्रोल पंप, सीएनजी पंप यासारख्या काही महत्त्वाच्या ठिकाणी 11 नोव्हेंबरच्या रात्रीपर्यंत पाचशे आणि हजारच्या नोटा स्वीकारण्यात येणार आहेत. मध्यरात्री 12 वाजल्यानंतर मात्र पाचशे आणि हजारच्या नोटा घेतल्या जाणार नाहीत. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मध्यरात्रीनंतर सुट्ट्या पैशांवरुन ग्राहकांसोबत भांडणं होण्याची शक्यता आहे. त्यामुळे होणारा वाद टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा