Advertisement

महाराष्ट्र होणार १ ट्रिलियन डाॅलरची अर्थव्यवस्था- मोदी

महाराष्ट्राने राबवलेला 'मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स २०१८' हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. अशा उद्योगशीलतेमुळेच महाराष्ट्र ३ वर्षांत गुंतवणूक वाढवण्यात देशात अग्रेसर आहे. अशीच वाटचाल सुरू राहिल्यास महाराष्ट्र २०२५ पर्यंत एक ट्रिलियन (खर्व) डाॅलरची अर्थव्यवस्था होईल, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या आर्थिक वाटचालीची प्रशंसा केली.

महाराष्ट्र होणार १ ट्रिलियन डाॅलरची अर्थव्यवस्था- मोदी
SHARES

सध्याच्या घडीला देशातील प्रत्येक राज्यात विकासावर स्पर्धा सुरू आहे. परदेशातील राष्ट्रांना आकर्षित करण्यासाठी सर्वच राज्य नवनवीन संकल्पना राबवत आहेत. त्यात महाराष्ट्राने राबवलेला 'मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स २०१८' हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. अशा उद्योगशीलतेमुळेच महाराष्ट्र ३ वर्षांत गुंतवणूक वाढवण्यात देशात अग्रेसर आहे. अशीच वाटचाल सुरू राहिल्यास महाराष्ट्र २०२५ पर्यंत एक ट्रिलियन (खर्व) डाॅलरची अर्थव्यवस्था होईल, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या आर्थिक वाटचालीची प्रशंसा केली. ते 'मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स २०१८'च्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होते.


परदेशी कंपन्यांची पसंती

गेल्या वर्षी महाराष्ट्र पायाभूत सुविधा उभारण्यात पुढे होता. त्या आधारेच देशात आलेल्या बहुसंख्य परदेशी कंपन्यांनी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रला सर्वाधिक पसंती दिली आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष महाराष्ट्रावर लागलं आहे.



५ ट्रिलियन डाॅलर क्लबचा सदस्य

देशात उद्योगांना पोषक वातावरण उपलब्ध करून देताना, नवीन उद्योगांच्या उभारणीपुढील अडथळे हटवण्यात येत अाहे. त्यामुळे भारत ५ ट्रिलियन डाॅलर क्लबचा सदस्य होण्याकडे वाटचाल करत आहे. सर्वसामान्यांच्या गरजा लक्षा घेऊन धोरणनिर्मिती केल्याचा हा परिपाक असल्याचं त्यांनी म्हटलं.

पूर्वीच्या सरकारने अनेक घोषणा केल्या, मात्र भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांनी या संकल्पना कागदावरच राहिल्या. पण औद्योगिक गुंतवणुकीचे नियम सोपे केले जात आहेत. अडचीणीचे नियम बदलले जात आहेत. जनधन योजना, स्वच्छ भारत, स्टँड अप इंडिया या सारख्या अनेक योजना राबवल्या जात असून त्याचा नागरिकांना फायदा होताना पाहायला मिळत आहे.



६० हजार कोटी गुंतवणार

तत्पूर्वी या परिषदेत उद्घाटनपर भाषण करताना रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबाने म्हणाले, नरेंद्री मोदी पंतप्रधानपदी आल्यापासून देशात असंख्य बदल पहायला मिळाले. मुंबई ही रिलायन्सची जन्मभूमी आहे. रिलायन्सने आतापर्यंत भारताच्या प्रगतीमध्ये पुढाकार घेऊन ठळक सहभाग नोंदवला आहे. जिओला मिळालेली पसंती लक्षात घेता. या पुढे ग्रामपंचायत, शाळा, रुग्णालय यांना इंटरनेट सुविधा जोडण्यात येतील. रिलायन्स पुढील १० वर्षांमध्ये ६० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करेल.


गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण

टाटा सन्सचे रतन टाटा म्हणाले, टाटा यापुढेही महाराष्ट्रात गुंतवणूक करत राहिल. या आधी औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक करताना अनेक अडचणी येत होत्या. मात्र आता गुतंवणुकीसाठी देशातील वातावरण पोषक आहे.



हेही वाचा-

हवाई चप्पल घालणाऱ्यालाही करता यावा हवाई प्रवास- पंतप्रधान



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा