Advertisement

हवाई चप्पल घालणाऱ्यालाही करता यावा हवाई प्रवास- पंतप्रधान

विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी एक दिवसीय मुंबईच्या दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान मोदी यांनी सर्वप्रथम जेएनपीटीच्या चौथ्या टर्मिनलचं लोकार्पण केल्यानंतर विमानतळाचं भूमीपूजन केलं. यावेळी पंतप्रधानांनी केंद्र सरकारच्या विकासकामांची माहिती देत असतानाच काँग्रेसच्या धोरणांवरही निशाणा साधला.

हवाई चप्पल घालणाऱ्यालाही करता यावा हवाई प्रवास- पंतप्रधान
SHARES

लटकाना, अटकाना आणि भटकाना हेच यापूर्वीच्या सरकारचं ध्येय होतं. पण आमचं सरकार प्रकल्प पूर्ण करण्याला प्राधान्य देत असून त्याची प्रचिती २०२२ पर्यंत सर्वांना येईल. 'हवाई चप्पल' घालणाऱ्यालाही हवाई प्रवास करता यावा, हे सरकारचं लक्ष्य असल्याचं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूमीपूजन कार्यक्रमात बोलत होते.

विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी एक दिवसीय मुंबईच्या दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान मोदी यांनी सर्वप्रथम जेएनपीटीच्या चौथ्या टर्मिनलचं लोकार्पण केल्यानंतर विमानतळाचं भूमीपूजन केलं. यावेळी राज्यपाल सी. विद्यासागरराव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित होते.


यावेळी भाषण करताना पंतप्रधानांनी केंद्र सरकारच्या विकासकामांची माहिती देत असतानाच काँग्रेसच्या धोरणांवरही निशाणा साधला. पंतप्रधानांनी भाषणाची सुरूवात मराठीतून केली. स्थानिक पदाधिकाऱ्यांना निमंत्रितांमधून डावलल्याने शिवसेनेने या कार्यक्रमावर बहिष्कार घालत पंतप्रधानांना काळे झेंडे दाखवले.



काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

  • पूर्वीच्या सरकारने जनेला अनेक आश्वासने दिली. अनेक प्रकल्पांच्या घोषणा केल्या. पण २०-३० वर्षे उलटूनही या योजना, प्रकल्प पूर्ण होऊ शकले नाही.
  • अनेक आमदार, खासदार, सरकार येऊन गेले. परंतु कुठल्याही योजनांची कामे पुढे सरकली नाही. त्यांच्या काळात देशभरात अंदाजे १० लाख कोटी रुपयांचे प्रकल्प लटकले होते. पण आमच्या सरकारने ते सुरू केले.
  • कारण, ‘लटकाना, अटकाना आणि भटकाना’ हे पूर्वीच्या सरकारचं धोरण होतं. म्हणून कोणताही प्रकल्प पूर्ण करण्याऐवजी तो लटकवण्यावरच त्यांचा भर होता.
  • नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मंजुरी मिळून २० वर्षांहून अधिक अनेक वर्षे झाली होती. पण जेव्हा माझ्यापुढे हा आणि यासारखे इतर प्रकल्प आले, तेव्हा ते मी मार्गी लावण्याचे ठरवले.
  • नवी मुंबई विमानतळाचं स्वप्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात या बघण्यात आलं आणि मी पंतप्रधान झाल्यावर हे स्वप्न मार्गी लावत आहे.
  • २० ते २५ वर्षांपूर्वी देशभरातील विमानतळावर जेवढी वाहतूक होत होती. त्यापेक्षा जास्त वाहतूक एकट्या मुंबई विमानतळावरून होत आहे. त्यामुळे जशी बससाठी गर्दी असते तशी विमानतळावर गर्दी असते.
  • हे झालं कारण आपल्या देशात हवाई धोरणच नव्हतं. पण देशात पहिलं हवाई धोरण बनवणारं आमचं सरकार आहे.
  • याआधी विमानावर 'महाराजा'चं चित्र असायचं. कारण पूर्वी श्रीमंत लोकांनाच विमानप्रवास शक्य होता. पण हवाई क्षेत्र विस्तारत असल्याने हवाई चप्पल घालणाऱ्यालाही हवाई प्रवास शक्य झाला पाहिजे.
  • स्वातंत्र्यापासून आजपर्यंत देशात केवळ ४५० विमान उडतात. पण गेल्या वर्षभरात ९०० नवीन विमानांची आॅर्डर देण्यात आली आहे. देशभरात १०० हून जास्त विमानतळ झाल्यास रोजगाराला मोठा हातभार लागेल. पर्यटनाला चालना मिळेल.
  • २०२२ पर्यंत महाराष्ट्रात ट्रान्स हार्बर लिंक रोडवर गाड्या धावतील, सर्बबन रेल्वे काॅरिडाॅर पूर्ण झालेला असेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं कामही पूर्ण झालेलं असेल.
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा