Advertisement

फाटक्या नोटांचं करायचं काय? हा घ्या उपाय!

फाटक्या नोटांचं करायचं काय? असा प्रश्न आपल्यापैकी बहुतेक सर्वांनाच कधी ना कधी पडला आहे. आणि शेवटी त्यावर काहीच उत्तर न सापडल्यामुळे अशा नोटा कुणाकडे तरी कशातरी खपवायच्या मागे आपण लागतो! पण या प्रश्नावर स्वत: रिझर्व्ह बँकेने उत्तर देऊन ठेवलंय. आणि तेही तब्बल ८ वर्षांपूर्वी!

फाटक्या नोटांचं करायचं काय? हा घ्या उपाय!
SHARES

फाटक्या नोटांचं करायचं काय? असा प्रश्न आपल्यापैकी बहुतेक सर्वांनाच कधी ना कधी पडला आहे. आणि शेवटी त्यावर काहीच उत्तर न सापडल्यामुळे अशा नोटा कुणाकडे तरी कशातरी खपवायच्या मागे आपण लागतो! कधी हा प्लॅन यशस्वी होतो, तर कधी या नोटा आपल्याच गळ्यात पडतात. पण या प्रश्नावर स्वत: रिझर्व्ह बँकेने उत्तर देऊन ठेवलंय. आणि तेही तब्बल ८ वर्षांपूर्वी!

२००९मध्ये रिझर्व्ह बँकेने जुन्या-फाटक्या नोटा स्विकारण्याबाबत धोरण मंजूर केले होते. मात्र, कित्येक लोकांना हे माहितच नाही. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा लोकांना माहिती व्हावं यासाठी हे धोरण लोकांपर्यंत पोहोचवलं आहे. या धोरणानुसार, फाटलेल्या नोटा म्हणजे ज्यांचा एक भागच नाहीये किंवा ज्या नोटेचे अनेक तुकडे झाले आहेत.


काय आहे हे धोरण?

१. एक रुपया, दोन रूपये, पाच रूपये, दहा रूपये आणि वीस रूपयांच्या फाटलेल्या नोटांचा सर्वात मोठा भाग हा नोटेच्या आकाराच्या ५० टक्क्यांहून अधिक आकाराचा असेल, म्हणजेच तुमची नोट ५० टक्क्यांहून कमी फाटलेली आहे, तर तुम्हाला रिजर्व्ह बँक पूर्ण पैसे परत करेल.

२. त्याचप्रमाणे, ५० किंवा त्यापेक्षा अधिक किंमतीच्या फाटलेल्या नोटेचा सर्वात मोठा भाग हा ६५ टक्क्यांपेक्षा जास्त आकाराचा असेल, तर पूर्ण पैसे परत मिळतील.

३. मात्र, ५० किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या नोटेचा सर्वात मोठा भाग हा ४० टक्क्यांपेक्षा मोठा आणि ६५ टक्क्यांपेक्षा लहान असेल, तर तुम्हाला अर्धे पैसे परत मिळतील.


नोटांवर लिहिणं टाळा!

लिहिलेल्या नोटाही काही ठिकाणी स्विकारल्या जात नाहीत. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या याच धोरणानुसार तुम्ही अशा लिहिलेल्या नोटा रिझर्व्ह बँकेला परत देऊ शकता. मात्र, त्याबदल्यात तुम्हाला कोणतीही नवीन नोट मिळणार नाही. त्या नोटांइतकी रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाईल. त्यामुळे, नोटांवर लिहिणं टाळणंच सोयीस्कर आहे!



हेही वाचा

फोर्टमध्ये सापडला फाटक्या नोटांचा खच!


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा