Advertisement

फोर्टमध्ये सापडला फाटक्या नोटांचा खच!


फोर्टमध्ये सापडला फाटक्या नोटांचा खच!
SHARES

फोर्टच्या बोरा बाजारमधील प्रबोधन इमारतीच्या हाऊस गल्लीत दुपारी दीडच्या सुमारास नोटांचा खच पाहायला मिळाला. विशेष म्हणजे या नोटांमध्ये बाद झालेल्या १००० आणि ५०० च्या नव्हे, तर १००, ५०, २० सह ५०० रुपयांच्या नोटांचा समावेश होता. या सगळ्या नोटा भिजलेल्या आणि फाटलेल्या अवस्थेत होत्या.

"ज्या हाऊस गल्लीत या नोटा सापडल्या, ती गल्ली सकाळी स्वच्छ करण्यात येते. तरीही भर दुपारी या नोटा सापडल्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसल्याची माहिती स्थानिक रहिवासी विनायक सानप यांनी दिली. या गल्लीतील काही वायर्सवर देखील नोटा पडल्याचं सानप यांनी सांगितलं.

या सगळ्या नोटा जुन्या आणि फाटलेल्या असल्या, तरीही या नोटा खऱ्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र या नोटा नेमक्या कोणी आणि का फेकल्या? हे सांगणं कठीण असल्याचं पोलिसांनी सांगितलं.  

दीडच्या सुमारास या नोटा दिसताच एमआरए मार्ग पोलिसांना कळवण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी या सगळ्या नोटा जप्त केल्या. या सगळ्या नोटा पंचनाम्यानंतर आम्ही ताब्यात घेतल्या असून पुढील तपास सुरु असल्याची माहिती एमआरए मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखलाल वर्पे यांनी दिली.हेही वाचा -

रवी पुजारीच्या शुटर्सना अटक, आरोपींचे शिल्पा शेट्टी कनेक्शन

चेक छूमंतर करणारी टोळी जेरबंद!


संबंधित विषय
Advertisement